Petrol Diesel Rate on 18th August 2023: आधीच महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचं लक्ष आता पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडेच लागलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी झाले की, नाही? महागड्या इंधन दरांपासून सुटका झाली का? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अशातच देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज 18 ऑगस्ट, आजही देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थेच आहेत. आजही दर स्थिर आहेत. देशातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळत आहे.  


एक वर्षांहून अधिक काळापासून देशातील किमती स्थिर 


एक वर्षाहून अधिक काळ लोटला असून देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. किमतीतील बदल किंवा सवलतीबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही विशिष्ट घोषणाही करण्यात आलेली नाही.


राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय?



  • पुण्यात पेट्रोलचे दर 105.96 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर आहे.

  • नाशकात पेट्रोलचे दर 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

  • अहमदनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 106.96 रुपये, तर एक लिटर डिझेल 93.46 रुपयांना

  • सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 108.01 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.48 रुपये प्रति लिटर

  • सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.20 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 92.74 रुपयांना

  • कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

  • नागपुरात पेट्रोल 106.06 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर

  • गडचिरोलीत 107.24 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 93.76 रुपये प्रति लिटर


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 



  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).