Petrol Diesel Rate Today 17th July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल पुन्हा एकदा प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार होत असले तरी, भारतीय बाजारात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. जाणून घेऊया कच्च्या तेलाचा देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कितपत परिणाम झालाय ते सविस्तर... 


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 



  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).