(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Voter ID : निवडणुकीआधी घरबसल्या मतदान ओळखपत्र बनवा, ऑनलाईन मोबाईलवरच होईल काम
Voter ID Card : आता तुम्ही तुमचे मतदान ओळखपत्र घरबसल्या बनवू शकता. ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं वोटर आयडी लवकरात लवकर तयार करून घ्यावीत.
Voter ID Card Online Process : देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी (Election 2023) पाहायला मिळत आहे. यानंतर पुढील वर्षी लोकसभा निवडणुकाही (Lok Sabha Election 2023) होणार आहेत. त्यामुळे, जर तुमच्याकडे अद्याप मतदार ओळखपत्र (Voter ID Card) नसेल तर तुम्ही लवकरात लवकर वोटर आयडी बनवा. आता तुम्ही घरबसल्या तुमचं मतदार ओळखपत्र बनवू शकता. हे काम ऑनलाईन झटपट होईल, तेही तुमच्या मोबाईलवरून. याशिवाय, ज्यांचं नुकतच 18 वर्ष वय पूर्ण झालं आहेत आणि पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांनीही आपली मतदान ओळखपत्रे लवकरात लवकर तयार करून घ्यावीत.
घरबसल्या मतदान ओळखपत्र मिळवा
मतदार कार्डद्वारे तुम्ही मतदान करण्याचा हक्का बजावू शकता, याशिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर करू शकता. पूर्वीच्या काळी मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लोकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागायच्या. पण, आता हे काम तुम्ही आता घरी बसून करू शकता. निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे तुमचे मतदार कार्ड लवकर बनवा.
अगर आप 18 साल के हो गये हैं और अभी तक वोटर रजिस्ट्रेशन नहीं कराया है तो वीडियो में बताये स्टेप्स के अनुसार अपना वोटर रजिस्ट्रेशन करायें और वोट करने का अधिकार पायें।
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) November 10, 2023
अधिक जानकारी के लिये https://t.co/s2OXIwmiBh विज़िट करें या वोटर हेल्पलाइन ऐप डाउनलोड करें।#ECI #SVEEP pic.twitter.com/GEbeit9f9g
मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला नवीन यूजर पर्याय निवडावा लागेल आणि लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. यासोबतच, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेले संबंधित कागदपत्रे आणि फोटो अपलोड करावे लागतील. सर्व भरलेले तपशील काळजीपूर्वक तपासा आणि सर्व तपशील तपासल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
Form 8 serves as a crucial tool for democratic participation, allowing citizens to shift their residence, correct entries in the electoral roll, replace EPIC cards, and marking of Persons with Disabilities (PwD).
— Election Commission of India #SVEEP (@ECISVEEP) November 12, 2023
"Stay informed and be a responsible voter"#ECI #SVEEP #Form8 pic.twitter.com/1JRup4zuyy
ई-वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
- निवडणूक आयोगाच्या https://www.nvsp.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- E-EPIC कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही नवीन यूजर असाल तर सर्वात आधी लॉगिन करुन नोंदणी करावी लागेल.
- E-EPIC डाउनलोड पर्याय निवडा.
- EPIC नंबर अथवा रेफरन्स नंबर टाका.
- नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाका.
- त्यानंतर E-EPIC डाउनलोड काहा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये Digital Voter ID Card डाउनलोड होईल.