Sukanya Samriddhi Scheme : नवीन वर्षात आर्थिक गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात सरकाकडून खूशखबर मिळाली आहे. सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) आणि मुदत ठेव (FD Scheme) योजनेवरील व्याजदरात वाढ करत मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry ) चालू आर्थिक वर्षातील (Financial Year) चौथ्या तिमाही जानेवारी-मार्चसाठी सुकन्या योजना आणि मुदत ठेव योजनेतील व्याज दरात वाढ करत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारची सर्वसामान्यांना भेट
अर्थ मंत्रालयाने सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 0.20 टक्के आणि एफडीवरील व्याजदरात 0.10 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इतर सर्व छोट्या योजनांचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, अशीही माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आबे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितलं की, सुकन्या समृद्धी योजना आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींसाठी किरकोळ वाढीसह बहुतेक योजनांमधील व्याजदर समान पातळीवर आहेत.
सुकन्या योजनेच्या व्याजदरात वाढ
सुकन्या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे. तर या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी मुदत ठेवीचा दर 7.1 टक्के असेल. याआधी सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या कालावधीसह TD अनुक्रमे 8.0 टक्के आणि 7.1 टक्के होते.
पीपीएफमध्ये कोणताही बदल नाही
जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF च्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीपीएफचे दर एप्रिल-जून 2020 मध्ये बदलले होते, त्यानंतर दर कायम आहेत. एप्रिल-जून 2020 मध्ये हा दर 7.1 टक्क्यांवरून 7.9 टक्के करण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून पॉलिसी रेटमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर बँकांनाही जमा केलेल्या पैशांवर व्याज वाढवावं लागलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :