FD Interest Rate : सध्या गुंतवणूकीसाठी (Investment) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असं असलं तरी अद्यापही अनेक जण मुदत ठेव योजनांना (Fixed Deposit) अधिक प्राधान्य देतात. फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) म्हणजेच एफडी (FD) हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय आहे. मुदत ठेव योजनेतील गुंतवणूक सुरक्षित राहते आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. बाजारात अनेक एफडी योजनांमध्ये गुंतवणूकीचे पर्याय आहेत. विविध बँकांकडून मुदत ठेव योजनांवर चांगले व्याज दिलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय तपासून पाहा. त्यामुळे कोणत्या एफडी योजनेत जास्त परतावा मिळत आहे, हे तुम्हाला समजेल.


लवकरच बंद होणार ही खास FD योजना!


तुम्हीही एफडी (FD) योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका विशेष एफडी योजना ऑफर करतात. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेनेही (Punjab and Sindh Bank) खास मुदत ठेव योजना ऑफर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पंजाब आणि सिंध बँक विशेष एफडी योजना या महिन्यात म्हणजेच 31 जानेवारीला संपणार आहे.


अंतिम मुदतीसाठी उरले फक्त काही दिवस


पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडी 'धनलक्ष्मी 444 दिवस' मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमी वेळ शिल्लक आहे. या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही या एफडीमध्ये 31 जानेवारी 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता.


अति ज्येष्ठ नागरिकांना 8.05 टक्के व्याज


'धनलक्ष्मी 444 दिवस' या विशेष एफडी योजनेमध्ये गुंतवणुकीचा कालावधी 444 दिवसांचा आहे. या एफडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.4 टक्के देण्यात येते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.9 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 8.05 टक्के व्याज मिळत आहे.


पंजाब आणि सिंध बँकेला एक कोटी रुपयांचा दंड


कर्ज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय बँकेने सरकारी मालकीच्या पंजाब आणि सिंध बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ग्राहक सेवेच्या अभावामुळे हा दंड ठोठावण्यात आला.


(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bank FD Rates : 'या' सरकारी बँकांकडून व्याज दरात वाढ, एफडीवर 8.40 टक्क्यांपर्यंत व्याज दर; यादी पाहा