Sovereign Gold Bond Scheme February 2024 : जर तुम्ही सोने खरेदीच्या (Gold Rate) विचारात असाल, पण सोन्याचे वाढलेले दर पाहून तुम्ही चिंतेत असाल, तर तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी (Gold Shopping) करण्याची संधी आहे. सोनं गुंतवणूकदारांसाठी उत्तम सरकारी योजना (Government Scheme) आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही जास्त नफा कमावू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या (SGB Scheme) नवीन हफ्त्याला सुरुवात होत आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond Scheme) योजनेच्या पुढील हफ्ता फेब्रुवारी 2024 मध्ये सुरुवात होत आहे.
स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी!
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्ड योजनेचा चौथा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी गुंतवणूक सुरु होणार असून गुंतवणूकदारांना 12 फेब्रुवारीपासून गुंतवणूक करता येईल. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजने चौथा हफ्ता 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान सुरू होईल.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत कोण गुंतवणूक करू शकते?
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चालवण्यात येते, त्यामुळे ही सरकारी योजना असून यामध्ये सुरक्षेची हमी मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात 20 किलो सोने खरेदी करू शकतात.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची खास वैशिष्ट्ये
तुम्ही ऑनलाइन माध्यमातून सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला सोन्याच्या किमतीमध्ये प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळते. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, तुम्ही एकूण आठ वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करू शकता. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही पाच वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकता, तुम्हाला हा पर्याय देखील उपलब्ध आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारने नोव्हेंबर सर्वात पहिल्यांदा सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्रतिवर्ष 2.50 टक्के व्याजदराचा लाभ देखील मिळतो. हा व्याज दर सहामाही आधारित असतो.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत सोनं कसं खरेदी करायचं?
योजनेच्या चौथ्या मालिकेत सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), NSE, BSE मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस आणि व्यावसायिक बँकांशी संपर्क साधू शकता. SGB अंतर्गत सोनं खरेदी करण्यासाठी KYC आवश्यक आहे. यासोबतच पॅनकार्ड असणंही आवश्यक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :