Stock Market Closing On 12 March 2024 : आजच्या टेड्रिंग सत्रात गुंतवणूकदारांना (Investors) मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारचं ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) अत्यंत निराशाजनक ठरलं आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी आज वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली आहे. सेबी प्रमुखांच्या वक्तव्यानंतर आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली.
स्मॉलकॅप इंडेक्स चांगलाच घसरला
निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांपैकी पाचमध्ये घसरला आहे, ही गुंतवणूकदारांसाठई चिंताजनक बाब आहे. हे सलग दुसरे सत्र आहे, ज्यामध्ये निफ्टी निर्देशांकात 2 टक्के किंवा त्याहून अधिक घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मंगळवारच्या घसरणीमुळे निफ्टी निर्देशांक उच्चांकावरून 1,500 अंकांपेक्षा अधिक खाली पोहोचला आहे. 8 फेब्रुवारीत निफ्टीचा उच्चांक 16,691 होता, त्यावरून आता 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.
BSE Sensex | 73,667.96 | 74,004.16 | 73,342.12 | 0.22% |
BSE SmallCap | 42,831.29 | 43,802.19 | 42,645.12 | -2.11% |
India VIX | 13.64 | 14.20 | 13.58 | -2.55% |
NIFTY Midcap 100 | 48,086.85 | 48,891.20 | 47,862.40 | -1.41% |
NIFTY Smallcap 100 | 15,092.10 | 15,421.00 | 15,010.55 | -1.98% |
NIfty smallcap 50 | 6,984.85 | 7,113.40 | 6,946.20 | -1.63% |
Nifty 100 | 22,840.90 | 22,990.05 | 22,784.90 | -0.24% |
Nifty 200 | 12,293.65 | 12,380.85 | 12,269.80 | -0.42% |
Nifty 50 | 22,335.70 | 22,452.55 | 22,256.00 | 0.01% |
बाजारमूल्यात मोठी घट
बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 385.57 लाख कोटी रुपयांवर घसरले जे मागील सत्रात 389.60 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 4.03 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी बँका आणि सरकारी पीएसयू शेअर्समध्ये जोरदार नफा बुकिंग झाली त्यामुळे बाजाराचा मूड बिघडला. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 165 अंकांच्या उसळीसह 73,667 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी केवळ 3 अंकांच्या वाढीसह 22,335 अंकांवर बंद झाला.
विविध क्षेत्राची स्थिती काय?
आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 687 अंकांनी किंवा 1.41 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. स्मॉल कॅप निर्देशांक 305 अंकांच्या घसरणीसह बंद झाला तर निफ्टी नेक्स्ट 50 933 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. क्षेत्रांमध्ये एफएमसीजी, बँकिंग, ऑटो, फार्मा, धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य सेवा समभाग तोट्यासह बंद झाले.
'या' शेअर्समध्ये वाढ
आजच्या व्यवहारात, HDFC बँकेचा शेअर 2.30 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला, यामुळे बाजारात काहीसा समतोल पाहायला मिळाला. याशिवाय टीसीएस 1.69 टक्के, मारुती सुझुकी 0.92 टक्के, इन्फोसिस 0.80 टक्के, रिलायन्स 0.65 टक्के वाढीसह बंद झाले.
'या' शेअर्समध्ये घसरण
एसबीआय शेअर 1.82 टक्क्यांनी घसरला, तर ITC 1.26 टक्क्यांनी घसरला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :