Job Vacancy : एकीकडे महागाई (Inflation) वाढत असताना दुसरीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं (Lay Off) संकट पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील काही महिन्यात बंपर नोकरभरती (Hiring) करण्यात येणार आहे. भारतातील अनेक कंपन्या पुढील तीन महिन्यात कर्मचाऱ्यांनी भरती करणार आहेत. देशातील 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांमध्ये नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचं नव्या अहवालात समोर आलं आहे. 


पुढील तीन महिन्यात होणार बंपर भरती


भारतीय कंपन्या आगामी जून तिमाहीसाठी नोकरभरतीसाठी सकारात्मक असल्याची चांगली बातमी समोर आली आहे.  मॅनपॉवर ग्रुपने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे की, जून तिमाहीमध्ये देशातील 36 टक्के कंपन्या कर्मचारी भरती करण्याची योजना आखत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जगभरात संभाव्य जागतिक मंदीचं सावट असल्यामुळे नोकरकपात सुरु असताना भारतात मात्र, नोकरभरतीसाठी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 42 देशांमध्ये नोकरभरतीसाठी भारताचा सर्वात मजबूत दृष्टिकोन असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.


36 टक्के कंपन्या हायरिंगसाठी सकारात्मक


मॅनपॉवर ग्रुपने मंगळवारी यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील 3,150 कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार,  भारतातील बहुसंख्य कंपन्या हायरिंग ट्रेंडबद्दल सकारात्मक आहेत. अहवालातील माहितीनुसार, एप्रिल-जून कालावधीसाठी, 50 टक्के कंपन्या वेतनवाढ देण्याची शक्यता आहे, तर 14 टक्के कंपन्या वेतन कपात करण्याच्या विचारात आहेत. तसेच, 33 टक्के कंपन्या कोणताही बदल करण्याच्या विचारात नाहीत. 


भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 


सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, एप्रिल-जून 2023 पासून भारताच्या निव्वळ रोजगारात 6 टक्के वाढ दिसून आली आहे, पण मागील तिमाहीच्या तुलनेने या आकडेवारी एक टक्क्यांची घट झाली आहे. मॅनपॉवर ग्रुपने निवेदनात म्हटलं आहे की, कंपन्या आणि संस्था 36 टक्के नेट एम्प्लॉयमेंट आउटलुकसह भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.


जगभरातील नोकरभरतीची टक्केवारी पाहा


भारताचा निव्वळ रोजगाराचे प्रमाण 36 टक्के असून हे, जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. यानंतर भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून त्यांचे हायरिंगचे प्रमाण 34 टक्के आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असून हे प्रमाण 32 टक्के आहे. जागतिक आकडेवारी रोमानियातील हायरिंगचं प्रमाण सर्वाधिक कमकुवत दृष्टीकोन -2 टक्के नोंदवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा