मुंबई: SBI Yono अ‍ॅपमधे नवीन अपडेट आणि वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आता लॉगिन न करता बँक तुमचे अकाऊंट बॅलेन्स चेक करु शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म, You Only Need One (Yono) चा वापर करुन घर बसल्या तुमच्या बँक अकाऊंटचा तपशील पाहू शकता. त्यासाठी योनो अपडेट करुन घ्यावे लागेल.

Continues below advertisement

स्टेट बँकेच्या SBI Yono अ‍ॅपमध्ये काही नविन वैशिष्ट्ये सादर केली आहेत. तुम्हाला बँक अकाऊंटचे तपशील पाहण्यासाठी आता अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी फक्त Yono SBI हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. 

या अॅपचा वापर कसा करायचा? योनो अॅपची ही सुविधा वापरण्यासाठी  तुमच्या मोबाईलमधे SBI Yono हे अ‍ॅप इनस्टॉल करा. त्यासाठी 6 अंकी MPIN किंवा यूजर आयडी आणि पासवर्ड महिती आवश्यक आहे.  SBI Yono अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील, लॉगिन (login),शिल्लक पहा (view balance),जलद पैसे पाठवा (quick pay).

Continues below advertisement

त्यावर शिल्लक पहा (view balance) या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला MPIN टाकणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही योनो अ‍ॅपशी लिंक केलेल्या सर्व खात्यांची शिल्लक तपासू शकता. सोबतच खात्यातील शिल्लक व्यवहार पाहाण्यासाठी‘व्यवहार पहा’हा पर्याय उपलब्ध असेल, ज्यावर तुम्ही निवडक खात्यांचे एम-पासबुक पाहू शकता.

एसबीआय 'योनो क्विक पे'चे वैशिष्ट्य (Yono Quick Pay)जलद पैसे पाठवाण्यासाठी 'Yono Quick Pay'या पर्यायाचा वापर करुन तुम्ही अॅपमध्ये लॉगिन न करता 25 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता. यासाठी प्रमाणीकरण करावे लागेल. हे प्रमाणीकरण MPIN / बायोमेट्रिक / फेस आयडी / युजर आयडी आणि पासवर्ड यांपैकी एकाच्या माध्यमातून केले जाऊ शकते.

SBI ने नोव्हेंबर 2017 मध्ये योनो प्लॅटफॉर्म लाँच केलं होतं, जेणेकरून ग्राहकांच्या बँकिंग संदर्भातील समस्या सोप्या पध्दतीने घर बसल्या सोडवले जातील. 

संबंधित बातम्या: