SBI MF Scheme : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी नवीन आणि चांगली योजना शोधत असाल, तर एसबीआय म्युच्युअल फंड मल्टीकॅप फंड सादर करणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 पासून या नवीन फंड ऑफरमध्ये (NFO) तुम्ही गुंतवणूक करु शकणार आहात. यामध्ये 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. हा एक ओपन एंड फंड आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा या योजनेतून बाहेर पडू शकतात.
NFO: कोणी गुंतवणूक करावी?
एसबीआयच्या MF च्या वेबसाइटनुसार, म्युच्युअल फंड हाऊस एक नवीन फंड आणत आहे. ज्यामध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. या योजनेत 15 क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग असेल. एसबीआयचा हा नवीन फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, तरुण पिढीसाठी एक चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने हा एक चांगला पर्याय आहे.
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता
एसबीआय मुच्युअल फंड मल्टीकॅप फंडात किमान रु 5000 गुंतवणे आवश्यक आहे. त्यानंतर 1 रुपायाच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. हा NFO गुंतवणूकदारांना लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देईल. प्रत्येक श्रेणीमध्ये किमान एकसमान एक्सपोजर असेल. या NFO मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील असेल. या फंडाला एक वर्षापूर्वी रिडीम किंवा एक्झिटवर 1% एक्झिट लोड भरावा लागेल. या योजनेचे निधी व्यवस्थापन आर श्रीनिवासन आणि मोहित जैन आहेत.
मल्टिकॅप फंड: रिस्क बॅलन्स
म्युच्युअल फंडाची मल्टीकॅप श्रेणी बाजारातून जास्त जोखीम घेऊ इच्छित नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड अधिक चांगली संधी असल्याचं बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम म्हटलं आहे. येथे गुंतवणूक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये केली जाते. त्याचा फायदा अशा प्रकारे समजू शकतो की जर लार्जकॅपचे मूल्यांकन खूप जास्त झाले आणि त्यात घसरण झाली, तर मिडकॅप किंवा स्मॉल कॅप मधून मिळणारा परतावा संतुलित होऊ शकतो. त्याचप्रमाणे मिडकॅप किंवा स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कमजोरी असल्यास लार्ज कॅप समतोल राखू शकतो. अशा प्रकारे बाजारातील जोखीम कमी होते.
मल्टीकॅप फंड: कोणत्या श्रेणीत किती गुंतवणूक करावी?
बाजार नियामक सेबीच्या मल्टीकॅप फंडांच्या नवीन नियमांनुसार, आता फंड हाऊसला इक्विटीमध्ये 75 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सेबीच्या नवीन नियमांनुसार मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये २५-२५ टक्के गुंतवणूक करावी लागेल. अशाप्रकारे, एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम लार्ज कॅपमध्ये गुंतवावी लागेल. यापूर्वी यावर कोणतीही मर्यादा नव्हती. नियम बदलण्यापूर्वी मल्टी कॅप्समध्ये लार्ज कॅप्सचे वेटेज अधिक होते. तथापि, म्युच्युअल फंड मल्टी कॅप फंडांचे पुनर्संतुलन करू शकतात. त्यांच्याकडे दुसऱ्या योजनेवर जाण्याचा पर्याय आहे.
(डिस्क्लेमर: हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या
Mutual Fund : या वर्षी 'या' सर्वोत्तम एसआयपी निवडा, पाच वर्षांत बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळवा
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती