Rules of Bank for Locker Facility : भारतीय नागरिकांना सोने आणि चांदीसारख्या दागिन्यांची खूपच हौस आहे. भारतात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. या सणांमध्ये महिला दागिने वापरत असतात. आपसूकच या हौसेतून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक होते. तर श्रीमंत लोक गुंतवणूक करण्याच्याच हेतूने सोन्या- चांदीची खरेदी करत असतात. परंतु, सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू घरात ठेवणे धोक्याचे असते. कारण दरोडा आणि चोरीसारख्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे गरजेचे असते.


 


मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन अनेक बॅंकांनी अशा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना लॉकरसारख्या सुविधा दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्यावेळी त्या वस्तूंचा वापरही करू शकता. फक्त मोठ-माठ्या बॅंकांमध्ये असलेली ही सुविधा आता ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्येही सुरू झाली आहे. 


लॉकरची सुविधा सर्वच लोकांना घेता येत नाही. त्यासाठी बॅंकेच्या काही अटी आहेत. या अटी पूर्ण करून तुम्ही बँकेने दिलेल्या लॉकर सुविधेचा लाभ घेऊ शकता. लॉकर सुविधा मिळवण्यासाठी सर्वात प्रथम लॉकर घेणाऱ्याचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. यासोबतच काही बँका तुम्हाला लॉकर देण्यापूर्वी बचत खाते उघडण्याची अट घालू शकतात. ही अट पूर्ण करून तुम्ही लॉकर सुविधेचा लाभ घेऊ शकता.


लॉकरची निवड करत असताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार लॉकर निवडू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार बँक लॉकरच्या सुरक्षेची जबाबदारी बँकांवर असते. तुमचे लॉकर असलेल्या बँकेत दरोडा, चोरी किंवा आगीसारखी घटना घडल्यास तुमच्या लॉकरची सर्व जबाबदारी  बँकेची असेल. त्याचबरोबर भूकंप आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बँकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरावे लागणार नाही.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही बँक लॉकरचा बराच काळ वापर केला नाही तर अशा परिस्थितीत बँक तुमचे लॉकर फोडू शकते. आरबीआयच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने लॉकर बराच वेळ अनलॉक केले नाही तर बँकेला लॉकर तोडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार नियमित लॉकर भरणाऱ्यांसाठी देखील लागू होतो. 7 वर्षे बँक लॉकर वापरले नाही तर बँक ते लॉकर तोडू शकते. परंतु, लॉकरमधील मौल्यवान वस्तू संबंधित खातेदाराला दिली जाईल, असा नियम आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये सुरक्षित ठेवू शकता. शिवाय तुम्हाला आवश्यक असेल त्यावेळी त्या वस्तूंचा वापरही करू शकता. 


महत्वाच्या बातम्या