Stock Market Opening : बाजार उघडताच सेन्सेक्स, निफ्टी ग्रीन झोनमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं आहे. सेन्सेक्स (Sensex) 707 अंकांनी वधारला तर निफ्टी (Nifty) 220 अंकांनी तेजीत आला आहे. दुपारी दीडच्या सुमारास संसदेत इकॉनॉमिक सर्वे सादर केला जाणार आहे. 2022 वर्षासाठी सर्वेमध्ये जीडीपी 9 ते 9.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे. महागाई वाढण्याची चिन्ह देखील या सर्वेत व्यक्त केली जाऊ शकतात. अशातच उद्या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे. त्यामुळे बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. 


आज बाजार उघडताच सेन्सेक्स 693 अंकांनी वर आला होता. ओपनिंगलाच सेन्सेक्स 736 अंकांनी तेजीत आला. म्हणजेच, 1.3 टक्क्यांनी उसळी घेतल्यानंतर 57,936.35 वर ट्रेड करत आहे. निफ्टीमध्ये 200 अंकांची तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर 17301 वर मार्केट ओपन झालं. बाजार उघडल्यानंतर 8 मिनिटांतच त्याने 17327 चा उच्चांक गाठला होता.







आज निफ्टी ग्रीन झोनमध्ये पाहायला मिळाला. तसेच फक्त 3 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. इतर 47 शेअर्स तेजीत आहेत. बँक निफ्टी देखील 408 अंकांनी किंवा 1.08 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 38,097 च्या पातळीवर कायम आहे.


Nifty स्टॉकची स्थिती


आज, विप्रो निफ्टीच्या चढत्या स्टॉकमध्ये 3.36 टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार करत आहे आणि ONGC 3.29 टक्क्यांनी वर आहे. टेक महिंद्रा 2.86 टक्क्यांनी आणि टायटन 2.72 टक्क्यांनी वर आहे. Divi's Lab 2.57 टक्के मजबुतीसह व्यापार करत आहे.


कोसळलेले शेअर्स 


इंडसइंड बँक 1.70 टक्क्यांनी आणि एलअँडटी 1.30 टक्क्यांनी खाली आलं आहे. एनटीपीसी 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.


प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती काय?


प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची स्थिती पाहिली तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक-एक टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 650 अंकांहून अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 9 वाजून 10 मनिटांनी प्री-ओपनमध्ये सेन्सेक्स 660 अंक म्हणजेच, 1.16 टक्क्यांच्या उसळीसह 57,861 वर ट्रेड करत आहे. निफ्टी त्याच वेळी 17301 च्या पातळीवर व्यवहार करत असून तो 200 अंकांच्या वर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha