Post Office Insurance Scheme: जर येत्या काळात तुम्ही लाईफ इन्शुरन्स प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये उत्तम पर्याय मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Postal Life Insurance-PLI) नावाची योजना पोस्ट ऑफिसमध्ये चालवली जाते. ही योजना 1 फेब्रुवारी 1884 रोजी ब्रिटीश काळात सुरू करण्यात आली होती. परंतु आजही ही योजना लोकांमध्ये फारशी लोकप्रिय नाही. ही योजना 50 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम देते. त्यासोबतच या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे उत्तम लाईफ इन्शुरन्स प्लानच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा विचार नक्की करा. 


पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोण खरेदी करू शकतं? 


पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुरक्षा पॉलिसी कोणीही खरेदी करू शकतं. 19 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला बोनससह किमान 20 हजार रुपये आणि कमाल 50 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. यादरम्यान, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ही रक्कम त्याच्या वारस किंवा नॉमिनीला जाते.


4 वर्षांनी कर्ज घेण्याचाही पर्याय 


सलग चार वर्षांपर्यंत पॉलिसी सुरू ठेवल्यानंतर पॉलिसी होल्डर यावर कर्ज देखील घेऊ शकतात. जर तुम्हाला पॉलिसी अनेक वर्षांपर्यंत सुरू ठेवायची नसेल, तर तुम्ही ही पॉलिसी 3 वर्षांनी सरेंडर देखील करू शकता. परंतु, जर तुम्ही ही पॉलिसी 5 वर्षांपूर्वी सरेंडर केलीत, तर तुम्हाला यावर मिळणारा बोनस मिळणार नाही. 5 वर्षांनी पॉलिसी सरेंडर करणाऱ्यांना विम्याच्या रकमेवर बोनस दिला जातो. 




हे फायदे तुम्हाला माहिती हवेच? 


पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये भरण्यात आलेल्या प्रीमियमला इन्कम टॅक्स अॅक्ट सेक्शन 80C अंतर्गत सूट मिळते. या प्लानमध्ये प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला मासिक, सहामाही आणि वार्षिक असे तीन पर्याय दिले जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, पर्याय निवडू शकता. एवढंच नाहीतर, तुम्ही तुमची इच्छा असल्यास या पॉलिसीचे 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करू शकता, 


या प्लॅनमध्ये तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरण्याचा पर्याय दिला जातो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता. एवढेच नाही तर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही या पॉलिसीचे 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट ॲश्युरन्स पॉलिसीमध्ये (Endowment Assurance Policy) रूपांतरित करू शकता, बशर्ते कन्वर्जनची तारीख ही प्रीमियम पेमेंटच्या समाप्तीची तारीख असेल किंवा मॅच्युरिटीच्या तारखेच्या (Date of Maturity) एक वर्षाच्या आत होऊ नये. याशिवाय, तुम्ही पॉलिसी देशाच्या कोणत्याही भागात हस्तांतरित करू शकता.


योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं?  


आधी या पॉलिसीचा लाभ केवळ सरकारी आणि निमशासकीय कर्मचारी घेऊ शकत होते. परंतु, 2017 पासून पीएलआय अंतर्गत सुरू असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ डॉक्टर, इंजिनिअर, वकील, मॅनेजमेंट कंसल्टेंट, चार्टर्ड अकाउंटेंट, आर्किटेक्ट, बँकर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ही पॉलिसी ऑनलाईन देखील घेऊ शकता. अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/pli.aspx लिंकवर क्लिक करा. किंवा टोल फ्री नंबर 1800 180 5232/155232 वर फोन करुन तुम्ही माहिती घेऊ शकता. 



(वर देण्यात आलेली पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीला 'लखपती' करणारी सरकारी योजना; तीनपट रिटर्न्स, 21 व्या वर्षी मुलगी होईल 70 लाखांची मालकीन