NPS Rule Change : एनपीएस (NPS) धारकांसाठी म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) योजनेअंतर्गत खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून संदर्भातील महत्त्वाचा नियम बदलणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFDRDA) त्यांच्या NPS खातेधारकांना त्यांच्या NPS खातेधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 1 एप्रिलपासून 'आधार' पडताळणी करणे अनिवार्य केले आहे.
NPS कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार
एनपीएसच्या नवीन लॉग-इन नियमांनुसार, सीआरए प्रणाली Two Factor Identification अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 पासून NPS च्या सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी (CRA) सिस्टममध्ये लॉगिन करणाऱ्या सर्व पासवर्ड-आधारित वापरकर्त्यांसाठी नवीन सुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. पीएफआरडीएने अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकात या संदर्भात माहिती दिली आहे.
अशा प्रकारे लॉग इन करावं लागेल
CRA प्रणालीच्या अनधिकृत वापराचा धोका टू फॅक्टर आयटेंन्टीफिकेशन कमी केला जाऊ शकतो. यासाठी पीएफआरडीएने सीआरए प्रणाली टू फॅक्टर आयटेंन्टीफिकेशन प्लॅटफॉर्म म्हणून तयार केली आहे. एनपीएसमध्ये लॉगिन करण्यासाठी युजरला आयडी आणि पासवर्ड-आधारित लॉग-इन प्रक्रियेतून जावं लागेल. त्यासाठी युजरला आधार पडताळणी करणे, बंधनकारक करण्यात आलं आहे.
एनपीएस अकाउंटसोबत आधार लिंक
NPS वापरकर्ते त्यांच्या युजर आयडीशी आधार लिंक केल्यानंतर, आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हे ओटीपी प्रविष्ट केल्यानंतरच NPS खाते लॉग इन केले जाऊ शकेल. त्यामुळे एनपीएससाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
2FA टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे फायदे
- CRA प्रणालीमध्ये गैरवापर आणि सुरक्षेचा धोका टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे कमी केला जाऊ शकतो.
- यामुळे NPS व्यवहार अधिक सुरक्षित होईल.
NPS खात्यातून पैसे केव्हा काढता येता?
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) 1 फेब्रुवारीपासून लागू झालेल्या नवीन नियमामुसार, NPS खातेधारक मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घर खरेदी, वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्के रक्कम काढू शकतील. हा याशिवाय तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतील.
NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी 'या' अटींची पूर्तता करणे आवश्यक
- NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, तुमचे खाते किमान 3 वर्षे किंवा त्याहून जुने असले पाहिजे.
- एनपीएस खात्यातून काढलेली रक्कम खात्यात जमा निधीच्या एक चतुर्थांश रकमेपेक्षा जास्त नसावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :