मुंबई: ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही मालमत्ता नाही त्यांचा क्रेडिट कार्ड (Credit Card Loan) आणि वैयक्तिक कर्जाकडे (Personal Loan) मोठा कल असल्याचं सध्याचं चित्र आहे. पण गेल्या काही कालावधीत या कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) त्यासंबंधित कठोर नियम आखले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता म्युच्युअल फंडमधील (Mutual Fund) गुंतवणूक ही कर्जाचा नवा पर्याय म्हणून उपलब्ध होत आहेत. या कर्जावरील व्याजदरही तुलनेने कमी असल्याने ते एक प्रभावी माध्यम म्हणून समोर येत असल्याचं दिसतंय. 


सुलभ कर्जाच्या मोहात पडून सर्वसामान्य लोक अनेकदा कर्जाला बळी पडत कर्जबाजारी होताना दिसतात. विनातारण कर्ज घेतल्यामुळे चढत्यादराने व्याज दर लागू होतो आणि त्याची परतफेड करणे कठीण होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक शिस्त बिघडत आर्थिक कणा मोडून पडतो .


क्रेडिट कार्डवरील कर्जासाठी 15 ते 18 टक्के व्याजदर 


वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्ज यावर व्याजदर हा 15 ते 18 टक्के इतका आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेच अशा कर्जासंबंधी कठोर नियम आखले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज यामध्ये अनुक्रमे 29.9 टक्क्यांनी आणि 25.5 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.


विनातारण कर्जासाठी म्युचुअल फंडाचा पर्याय


सामान्य माणसाकडे कर्ज घेण्यासाठी तारण नसल्यामुळे विनातारण कर्ज घेण्याकडे वाढत कल जाणवत आहे. पर्यायाने अशी विनातारण कर्ज ही चढत्या व्याजदरांनी पुरवली जातात. आतापर्यंत सोने हे कर्ज घेण्यासाठी साधन आणि तारण म्हणून पहिले जात होतं. परंतु मागील काही वर्षात म्युचअल फंड हा गुंतवणूक आणि तारण म्हणून नवीन पर्यायाच्या स्वरूपात एक प्रभावी माध्यम म्हणून उदयास येत आहे. 


सध्या 47 लाख कोटी रुपये इतकी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी गुंतवणूक केल्यामुळे यापुढील काळात तारण कर्ज घेण्यासाठी अशा युनिट्सचा वापर सातत्याने होईल अशी लक्षणे दिसत आहेत. सध्या अशी कर्ज 9 टक्के व्याजदराने उपलब्ध आहेत.


रिजर्व्ह बँकेचे पाऊल स्वागतार्ह 


रिजर्व्ह बँकेने घेतलेल्या कठोर पावलांचे स्वागत करत मिरे फियनान्शियल सर्व्हिसेसचचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कन्हैया म्हणाले, "आर्थिक शिस्तीबरोबरच जोमदार पतविषयक वातावरण आणि व्यवस्थापनामध्ये सहजरित्या मिळणाऱ्या विनातारण कर्जामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा फुगा किंवा बुडबुडा निर्माण होणार याची काळजी RBI ने घेतली आहे. या दूरदृष्टीने घेतलेल्या पावलांमुळे बँकिंग आणि अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवून कुठल्याही प्रकारच्या आव्हानास तोंड देता येईल आणि पर्यायाने देशातील आर्थिक पर्यावरण अधिक सक्षम होण्यास हातभार लागेल"


ही बातमी वाचा: