Mutual Fund SIP: शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या तेजीमुळं म्युच्युअल फंडांची मागणी वाढत आहे. विशेषत: एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड एसआयपी खातेधारकांची संख्या विक्रमी उच्च पातळीवर पोहोचली आहे. म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) करणाऱ्या लोकांची खाती साडेसात कोटींच्या पुढे गेली आहेत.
एकाच महिन्यात 40 लाखांहून अधिक एसआयपी खाती
म्युच्युअल फंडांची संघटना असलेल्या AMFI च्या आकडेवारीनुसार, SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये विक्रमी 40.03 लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत. एकाच महिन्यात 40 लाखांहून अधिक एसआयपी खाती उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह, एकूण SIP खात्यांची संख्या 7.63 कोटींवर पोहोचली आहे. डिसेंबरपूर्वी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये अनुक्रमे 34.66 लाख आणि 30.8 लाख नवीन SIP खाती उघडण्यात आली होती.
SIP AUM मध्ये देखील वेगवान वाढ
AMFI डेटा दर्शविते की नवीन SIP खाती उघडण्यासोबत, SIP द्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक देखील वेगाने वाढत आहे. डिसेंबर 2023 मध्ये म्युच्युअल फंडांना SIP द्वारे 17,610 कोटी रुपये मिळाले. अशा प्रकारे एसआयपी एयूएम 9.95 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले.
जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांना आवडले
जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करायला आवडते, ज्यांच्याकडे जास्त जोखीम घेण्याची क्षमता असते. या कारणास्तव नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. या प्रकारचे गुंतवणूकदार बहुतेक म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबतात. अशा प्रकारे ते बँक एफडी, सोने इत्यादी पारंपारिक गुंतवणूक माध्यमांमधून चांगले परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
बाजारातील तेजीला मदत
सध्या बाजारपेठ तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळं बाजारात गुंतवणुकीसाठी आकर्षित होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला आहे. NSE च्या निफ्टी 50 ने आज प्रथमच 22 हजार अंकांची पातळी ओलांडण्यात यश मिळवले आहे. येत्या काही महिन्यांतही बाजारात तेजी राहील, असा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या: