Multiple Saving Account Benefits : बचत खाते उघडण्यासाठी बँक ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देत असते. बँकेकडून अनेक आकर्षक योजनाही लाँच करण्यात येतात, याद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये थोडाफार फरक असतो. पण या ऑफर पाहून वेगवेगळ्या बँकमध्ये बचत खाते उघडण्याची इच्छा होते. एकापेक्षा जास्त बचत खात्याची कल्पना चांगली आणि फायदेशीर आहे. पण, एकापेक्षा जास्त बचत खाती असल्यानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते... त्याबाबत जाणून घेऊयात (Utility News In Marathi)


1. मिनिमम बॅलेन्स/किमान शिल्लक (Minimum Balance)
बचत खात्यात मिनिमम रक्कम ठेवणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा. बचत खात्याची सेवा पुरवण्यासाठी अथवा ते मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीनं बँकने मिनिमम बॅलेन्स अनिवार्य केलाय. बचत खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास बँककडून विशिष्ट शुल्क किंवा दंड आकारला जातो. 
अशा स्थितीत एकापेक्षा जास्त बचत खाती असतील तर मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागेल. एक खातं असल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं शक्य आहे. पण एकापेक्षा जास्त खाती असल्यास हे एकप्रकारे कठीण काम होऊ शकतं. 


2. पैसे काढण्याची मर्यादा(Withdrawal Limit)
बचत खात्यामधून डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी प्रतिदिवस मर्यादा असते. त्यामुळे बचत खात्यामधून प्रतिदिवस तुम्हाला ठरावीक रक्कम काढता येते. पण एकापेक्षा जास्त बचत खाती असल्यास तुम्हाला फायद्याचं आहे. कारण, वेगवेगळ्या खात्यामार्फत तुम्ही एकत्र मोठी रक्कम काढू शकता.  


एखदा व्यक्ती किती बचत खाती काढू शकतो, याला कोणतीही मर्यादा नाही. पण बचत खातं जर विशिष्ट कालावधीपर्यंत वापरात नसेल (देवाण-घेवाण) तर बँकेकडून खातं निष्क्रिय (डॉरमैन्ट )करण्यात येतं. त्याशिवाय बँकेकडून आर्थिक दंडही करण्यात येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकापेक्षा जास्त बचत खाती असल्यास ती वापरात येणेही तितकंच महत्वाचं आहे. 


3. बँक शुल्क (Bank Charges)
अनेक बँका काही सेवा अगदी मोफत पुरवतात. पण काही सेवांसाठी शुल्क आकारले जाते. कोणत्या सेवांसाठी बँकेकडून शुल्क आकारले जाते, याची माहिती असणं गरजेचं आहे. अनेकदा ग्राहकाला कोणत्या सेवांसाठी शुल्क आकारण्यात आलं, याबाबतची माहिती नसते. त्यामुळे बँकेत खातं उघडताना सर्व माहिती जाणून घ्यावी... 


आणखी वाचा : 


PPF खात्यामुळे व्हाल कोट्यधीश, निवृत्तीनंतर 2.26 कोटी मिळवण्यासाठी सरकारी योजनेत करा गुंतवणूक  


Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेचे अनेक फायदे, एकदा करा गुंतवणूक महिन्याला मिळेल परतावा