Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (Investment) करणं काहीसं धोक्याचं मानलं जातं, पण योग्य गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस परतावा (Multibagger Return) मिळवता येतो. असे काही शेअर्स (Stocks) आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नशीब बदलण्याचं काम केलं आहे. पण, महत्त्वाचं काही शेअर्सने दिर्घ काळ गुंतवणूक (Share Market Return) केल्यावर भरघोस परतावा दिला आहे, तर अनेकांनी अतिशय कमी कालावधीत मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत. असाच एक मल्टिबॅगर शेअर्समध्ये 'भारत रसायन' (Bharat Rasayan Ltd) कंपनीचा स्टॉक आहे. या स्टॉकने 10 वर्षांत आपली 10 हजार रुपयांची गुंतवणूक 8 लाख रुपयांमध्ये रूपांतरित केली आहे.
8000 टक्के परतावा
भारत रसायन ही रासायनिक क्षेत्रातील (Chemical Industry Company) एक स्मॉलकॅप कंपनी आहे. गेल्या 10 वर्षांत भारत रसायन कंपनीच्या शेअरची किंमत 112 रुपयांवरून 9000 रुपयांपर्यंत वाढली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 8000 टक्के दणदणीत नफा दिला आहे.
10,000 रुपये गुंतवणाऱ्यांना 8 लाख रुपयांचा भरघोस परतावा
भारत रसायन हे रासायनिक क्षेत्रातील एक स्मॉलकॅप आहे. गेल्या 10 वर्षात या कंपनीचे शेअर्स वाढले आहेत. हा स्टॉक 112 रुपयांवरून वाढून 9000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 8000 टक्के फायदा झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी भारत रसायन कंपनीच्या शेअर्समध्ये 10 वर्षे गुंतवणूक केली. त्यांना आतापर्यंत सुमारे आठ लाख रुपये परतावा मिळाला आहे.
10 वर्षात या कंपनीचे शेअर्स किती रुपयांनी वाढले?
भारत रसायन कंपनीचा शेअर सोमवारी सकाळी 9,120 रुपयांवर ट्रेड करत होती. यानंतर दिवसभरातील उलाढालीनंतर या स्टॉकची किंमत 9,184.65 रुपये झाली. भारत रसायन कंपनीचा मार्केट कॅप 3,740 कोटी रुपये असून ही कंपनी केमिकल संशोधन आणि विकासाचं काम करते.