Sukanya Samriddhi Scheme : सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही केंद्र सरकारची (Government) योजना आहे, ही योजना खास मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. पालकांना मुलीचं लग्न आणि शिक्षण यासारख्या भविष्याच्या दृष्टीने निधी गोळा करण्यात मदत करणे, हे या योजनेचं वैशिष्ट्यं आहे. ही योजना केंद्र सरकारने 2 डिसेंबर 2014 रोजी सुरू केली. देशातील मुलींचं भविष्य घडवण्यासाठी केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची माहिती आणि त्यात गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊया.


तुम्हाला किती व्याज मिळेल?


ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज देत आहे. या योजनेत, प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवसाच्या शेवटी आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यानच्या किमान शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याज जमा केले जाते.


सुकन्या समृद्धी योजनेमधून मुदतपूर्तीपूर्वी पैसे कसे काढायचे?


मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, SSY खाते तात्काळ बंद केले जाते आणि व्याजासह उर्वरित रक्कम खातेधारकाच्या पालकांना किंवा नॉमिनिला दिली जाते. सुकन्या समृद्धी खातेधारकाच्या मृत्यूनंतर, खाते बंद होईपर्यंत, पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर उपलब्ध व्याजदरानुसार व्याज मिळते.


सुकन्या समृद्धी खाते कधी बंद होते?


जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते किंवा तिचे लग्न होते, यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं बंद केलं जातं. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद होते.


सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे कधी आणि कसे काढता येतील?



  • मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावरच सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे काढता येतात.

  • मुलीचं वय 18 वर्षे झाल्यावर मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते.

  • वर्षातून एकदा एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात. पण, यामध्ये अनेक अटी आणि नियम लागू आहेत.


सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड


सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी आहे. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 14 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच्या सात वर्षांत, सरकार जमा केलेल्या एकूण रकमेवर व्याज जमा होत राहते. अशा परिस्थितीत, या योजनेत गुंतवणूक करुन, तुम्हाला तीनपट लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तुम्ही 50 टक्केरक्कम काढू शकता आणि संपूर्ण रक्कम 21 व्या वर्षी काढू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


MSSC Saving Scheme : खास महिलांसाठी दमदार योजना! 7.50 टक्के व्याज, फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात