Credit Outreach Program : बँकेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. तुम्हाला गृह कर्ज (Home Loan), कारसाठी कर्ज ( Car Loan) किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज ( Education Loan) घ्यायचे आहे, परंतु, त्याबाबत तुम्हाला पुरेशी माहिती नाही. तर चिंता करण्याचे कारण नाही. कारण उद्या म्हणजे 8 जून रोजी देशाच्या अमृत मोहत्सवा निमित्ताने संपूर्ण देशभरातील सरकारी बँकांमध्ये क्रेडिट आउटरीच ( Credit Outreach) हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकारच्या सर्व योजनांसह शासनाच्या योजनांमध्ये नावनोंदणी करण्याबाबत ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेच्या शंका व प्रश्नांना उत्तरे दिली जातील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त राज्यस्तरीय बँकर्स समितीतर्फे देखील हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
अर्थमंत्रालयाअंतर्गत क्रेडिट आउटरीच हा कार्यक्रम देशभरातील सर्व जिल्ह्यांमधील बँकांमध्ये राबवला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्राहकांना बँकांच्या सर्व कर्जांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याबरोबरच ग्राहकांना बँकेत खाते देखील उघडता येणार आहे. छोटा व्यावसाय सुरू करू करण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांना देखील या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी कर्जापासून ते सोने कर्जापर्यंतची सर्व माहिती लोकांना या कार्यक्रमांतर्गत मिळू शकते. क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सार्वजनिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी केली जाईल. यासोबतच सर्वसामान्यांसाठी ग्राहक जागृती कार्यक्रमासोबतच आर्थिक साक्षरता कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या निमित्ताने 6 ते 12 जून दरम्यान आठवडाभर संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून अर्थ मंत्रालयाअंतर्गत क्रेडिट आऊटरीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी एक, दोन, पाच, दहा आणि वीस रूपयांची नवीन नाणी जारी केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
HDFC Bank : HDFC Bank ग्राहकांना झटका, आजपासून EMI महाग; जाणून घ्या नवे दर
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.