HDFC Bank MCLR Rate : खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.  एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. बँकेने आजपासून MCLRच्या दरात वाढ केली आहे. आरबीआयची पतधोरण बैठक सुरू आहे. बुधवारी रिझर्व्ह बँकेकडून धोरण जाहीर करण्यात येणार आहे. त्याआधीच एचडीएफसी बँकेने व्याज दरात वाढ केली आहे. 


> 35 बेसिस पॉईंट्सची वाढ


बँकेने MCLR दरामध्ये 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने नवीन दर 7 जूनपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. 


बँकेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीनुसार, ओव्हरनाइट लोन रेट 7.15 टक्क्यांहून वाढून 7.50 टक्के झाला आहे. तर, एक महिन्याचा MCLR Rates वाढून 7.55 टक्के, तीन महिन्यांसाठीचा दर 7.60 टक्के आणि 6 महिन्यांसाठीचा दर 7.70 टक्के झाला आहे.


>> जाणून घ्या HDFC Bank चे नवीन MCLR Rates


> ओव्हरनाइट - 7.50 टक्के
> 1 महिना - 7.55 टक्के
> 3 महिने - 7.60 टक्के
> 6 महिने - 7.70 टक्के
> 1 वर्ष - 7.85 टक्के
> 2 वर्षे - 7.95 टक्के
> 3 वर्षे - 8.05 टक्के


आधीदेखील बँकेकडून व्याज दरात वाढ


याआधीदेखील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेदेखील MCLR दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात अचानकपणे रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर सर्व बँकांनी MCLR दरात वाढ केली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: