LIC Housing Finance Home Loan Rates : जर तुम्हीही नवीन घर (Home Loan) घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एलआयसीने (LIC Home Loan Rates) गृहकर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. यामुळे आता ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर सर्व बँका आणि कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी व्याज दरात वाढ केली आहे. 


60 बेसिस पॉईंटची वाढ
एलआयसीने गृहकर्जालरील व्याज दरात 60 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. आता ग्राहकांना गृहकर्जासाठी 7.50 टक्के व्याज दर भरावा लागेल. एलआईसी हाइसिंग फायनॅन्सने (LIC HFL) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.


20 जूनपासून नवे व्याज दर लागू
एलआयसी गृहकर्जावरील नवीन व्याज दर 20 जून 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गृहकर्जावरील व्याज दर 7.50 टक्के असेल. एलएचपीएलआर (LICHFL) हा प्रत्यक्षात मानक व्याज दर आहे. याच्यासोबत एलआयसी गृहकर्जाचा व्याजदर जोडलेला आहे.


कंपनीच्या सीईओंनी माहिती दिली
एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विश्वनाथ गौर यांनी सांगितलंय की, 'बाजारातील सध्याच्या परिस्थितीनुसार व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. तुलना केल्यास, दर अजूनही खूप स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे गृहकर्जाची मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'


गेल्या महिन्यातही झाली होती वाढ
एलआयसीने मे महिन्यातही व्याजदरात वाढ केली ​​होती. कंपनीने अखेरच्या क्रेडिट स्कोअरनुसार व्याजदरात वाढ केली होती. 700 च्या वरील ग्राहकांसाठी सुरुवातीच्या गृहकर्ज दरात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली. यानंतर नवीन दर 6.9 टक्के करण्यात आला. त्यावेळी, कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी 25 बेसिस पॉइंट्स वाढवण्यात आले. हे दर 13 मेपासून लागू करण्यात आले होते.