FD Rate of Interest Hike of ICICI Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडी आणि सेविंग अंकाऊंटवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या दोन बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि पंजाब नँशनल बँकेने (Punjab National Bank) त्यांच्या मुदत ठेव (Fixed Deposit) व्याज दरात (Rate of Interest) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


याशिवाय इतरी अनेक बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय बँकेनेही (ICICI Bank) मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन व्याज दर पाक कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवर वाढवण्यात येणार आहेत. हे नवीन व्याज दर 16 जून 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. 


जर तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर जाणून घ्या आता तुम्हाला बँकेत मुदत ठेवीवर (FD) किती व्याजदराचा लाभ मिळेल. ICICI बँकेच्या उपलब्ध नवीन व्याजदरांबद्दल वाचा.


आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) दोन कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर



  • 7 ते 14 दिवसांची मुदत ठेव : 2.75%

  • 15 ते 29 दिवसांची मुदत ठेव : 2.75%

  • 30 ते 45 दिवसांची मुदत ठेव : 3.25%

  • 46 ते 60 दिवसांची मुदत ठेव : 3.25%

  • 61 ते 90 दिवसांची मुदत ठेव : 3.25%

  • 91 ते 120 दिवसांची मुदत ठेव : 3.75%

  • 121 ते 150 दिवसांची मुदत ठेव : 3.75%

  • 151 ते 184 दिवसांची मुदत ठेव : 3.75%

  • 185 ते ते 210 दिवसांची मुदत ठेव : 4.60%

  • 211 ते 270 दिवसांची मुदत ठेव : 4.60%

  • 271 ते 289 दिवसांची मुदत ठेव : 4.60%

  • 290 दिवस से एका वर्षापर्यंत मुदत ठेव : 4.60%

  • 1 वर्ष ते 2 वर्ष : 5.30%

  • 2 ते 3 वर्ष : 5.30%

  • 3 ते वर्ष : 5.70 %

  • 5 ते 10 वर्ष : 5.75%


आयसीआयसीआय बँकेत दोन ते पाच कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याज दर



  • 7 ते 14 दिवसांची मुदत ठेव : 3.10%

  • 15 ते 29 दिवसांची मुदत ठेव : 3.10%

  • 30 ते 45 दिवसांची मुदत ठेव : 3.50%

  • 46 ते 60 दिवसांची मुदत ठेव : 3.50%

  • 61 ते 90 दिवसांची मुदत ठेव : 3.75%

  • 91 ते 120 दिवसांची मुदत ठेव : 4.75%

  • 121 ते 150 दिवसांची मुदत ठेव : 4.75%

  • 151 ते 184 दिवसांची मुदत ठेव : 4.75%

  • 185 ते 210 दिवसांची मुदत ठेव : 5.00%

  • 211 ते 270 दिवसांची मुदत ठेव : 5.00%

  • 271 ते 289 दिवसांची मुदत ठेव : 5.10%

  • 290 दिवस से 1 वर्षापर्यंत मुदत ठेव : 5.10%

  • 1 ते 2 वर्ष मुदत ठेव : 5.25%

  • 2 ते 3 वर्ष मुदत ठेव : 5.25%

  • 3 ते 5 वर्ष मुदत ठेव : 5.50 %

  • 5 ते 10 वर्ष मुदत ठेव : 5.50%