Bank FD Rates:  बुधवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.4 टक्के वाढ केल्यानंतर आता देशातील दोन खासगी बँकांनी  मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात येईल असे म्हटले जात होते. 

आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्राने 2 कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 390 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 30 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 23 महिन्याच्या मुदत ठेवीवर 35 बेसिस प्वाइंट्सची वाढ करण्यात आली आहे. नवीन व्याज 6 मे 2022 पासून लागू झाली आहे.

आयसीआयसीआय बँकेने देखील 2 कोटी ते 5 कोटींच्या मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही 5 मे 2022 पासून लागू झाली आहे.

कोटक महिंद्रा बँकेतील मुदत ठेवीवरील नवीन व्याज दर ( 2 कोटींपेक्षा FD )

7 दिवस ते 14 दिवस - 2.50 टक्के15 दिवस ते 30 दिवस - 2.50 टक्के31 दिवस ते 45 दिवस - 3 टक्के46 दिवस ते 90 दिवस – 3 टक्के91 दिवस ते 120 दिवस - 3.5 टक्के121 दिवस ते 179 दिवस - 3.5 टक्के180 दिवसांपर्यंत - 4.75 टक्के181 दिवस ते 269 दिवस - 4.75 टक्के270 दिवसांपर्यंत - 4.75 टक्के271 दिवस ते 363 दिवस - 4.75 टक्के364 दिवसांपर्यंत - 5.25 टक्के390 दिवस ते 15 महिने - 5.50 टक्के15 महिने ते 18 महिने - 4.6%390 दिवस ते 15 महिने - 5.50 टक्के391 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधी - 5.50 टक्के23 महिन्यांपर्यंत - 5.60 टक्के23 महिने 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी - 5.60 टक्के2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी - 5.60 टक्के3 वर्षे ते 10 वर्षे - 5.75 टक्के  

ICICI बँकेचे नवीन व्याजदर (2 ते 5 कोटींच्या FD पर्यंत)

7 दिवस ते 14 दिवस - 2.75 टक्के15 दिवस ते 29 दिवस - 2.75 टक्के30 दिवस ते 45 दिवस - 3.00 टक्के46 दिवस ते 60 दिवस - 3.00 टक्के61 दिवस ते 90 दिवस - 3.25 टक्के91 दिवस ते 120 दिवस - 3.50 टक्के121 दिवस ते 150 दिवस - 3.50 टक्के151 दिवस ते 184 दिवस - 3.50 टक्के185 दिवस ते 210 दिवस - 3.75 टक्के211 दिवस ते 270 दिवस - 3.75 टक्के271 दिवस ते 289 दिवस - 4.00 टक्के290 दिवस ते 1 वर्ष - 4 टक्के1 वर्ष ते 389 दिवस - 4.50 टक्के390 दिवस ते 15 महिने - 4.50 टक्के15 महिने ते 18 महिने - 4.60 टक्के18 महिने ते 2 वर्षे - 4.65 टक्के2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे - 4.75 टक्के3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे - 4.80 टक्के5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे - 4.80 टक्के