Post Pffice Mis Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक उत्तम बचत योजना आहे. या योजनेत महिन्यातून एकदाच पैसे जमा करून हमी उत्पन्न मिळवता येते. विशेष बाब म्हणजे बाजारातील अस्थिरतेचा तुमच्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. तुम्हाला MIS खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्याची मॅच्युरिटी  पाच वर्षांची आहे. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न मिळू लागेल. 


MIS कॅल्क्युलेटर: प्रति वर्ष 13,200 रूपये  


एमआयएस कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपये एकरकमी जमा करून हे खाते उघडले तर मॅच्युरिटीनंतर पुढील पाच वर्षांसाठी त्याचे वार्षिक उत्पन्न 13,200 रुपये असेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला अकराशे रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला पाच वर्षांत 66 हजार रूपये व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस MIS वर सध्या 6.6 टक्के वार्षीक व्याज मिळत आहे.


1000 रुपये देऊन खाते उघडा


POMIS योजनेत किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणूकीसह खाते उघडता  येते. यामध्ये तुम्हाल एकल (सिंगल) आणि संयुक्त (जोड खाते) खाते उघडता येते. तुम्ही एका खात्यात किमान 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. MIS मध्ये दर महिन्याला व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.


खाते बंदही करता येते
खाते अकाली बंद करता येऊ शकते, सोबतच आपण ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकतो. नियमांनुसार एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेच्या दोन टक्के परत केले जातील. तुम्ही खाते उघडल्यानंतर तीन वर्षांच्या मुदतीपूर्वी कधीही पैसे काढल्यास तुमच्या ठेव रकमेपैकी एक टक्के रक्कम वजा केल्यावर परत केली जाईल.


POMIS: हे नियम जाणून घ्या
एमआयएसमध्ये दोन किंवा तीन लोक मिळून संयुक्त खातेही उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान दिले जाते.


तुम्ही संयुक्त खाते कधीही एका खात्यात रूपांतरित करू शकता. शिवाय एकाच खात्याचे संयुक्त खात्यात रूपांतर देखील करता येते.
 
तुम्ही एमआयएस खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता. 


मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मुदत आणखी पाच-पाच वर्षांसाठी वाढता येते.


एमआयएस खात्यात नामांकन सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. 


महत्वाच्या बातम्या


India Post GDS Bharti 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी! परीक्षेशिवाय होणार निवड