Green FD Investment Plan : भारत वेगाने प्रगती करत आहे. विकसित होण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रामध्ये काम सुरु आहे. याच दृष्टीने भारत हरित ऊर्जेकडेही (Greeb Power) वेगाने वाटचाल करत आहे. बँकांकडून (Bank) हरित प्रकल्पांना वित्तपुरवठा (Finance to Green Project) करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी बँकांनी ग्रीन एफडी (FD Scheme) योजनाही सुरू केली आहे. ग्रीन एफडी (Green FD) साधारण मुदत ठेव (Fixed Deposit) सारखी असते. ग्रीन एफडी (Green FD) गुंतवणूक योजना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा 1961 अंतर्गत समाविष्ट आहेत. यामुळे, ग्रीन एफडीमध्ये सुरक्षिततेची हमी मिळते आणि पैसे गमावण्याचा धोका नसतो. सध्या भारती स्टेट बँक (SBI), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank) आणि एयू बँक (AU Bank) ग्रीन एफडी (Green FD Plan) ऑफर करत आहेत.
ग्रीन डिपॉझिट म्हणजे काय? ( What is Green Deposit )
सध्या गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये पारंपारिक मुदत ठेवी (FD) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. पण, भविष्याकडे वाटचाल करताना आपण वापरत असणाऱ्या साधनांमध्ये बदल होत आहे. विविध उपकरणांमध्ये हरित ऊर्जेचा वापर केला जात आहे. या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध बँका ग्रीन एफडी योजना ( What is Green FD) राबवतात. या एफडी गुंतवणूकीतील रक्कम हरित ऊर्जेसंबंधित प्रकल्पांसाठी वापरली जाते. शिवाय, यामध्ये गुंतवणूकदारांना वित्तीय सुरक्षा आणि नैतिक गुंतवणूक यांचा लाभ होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर, पर्यावरणपूरक विकास आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प किंवा कंपन्यांच्या वित्तपुरवठ्यासाठी या ठेवींचा वापर केला जातो.
एसबीआय ग्रीन डिपॉझिट ( SBI Green Rupee )
स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे एसबीआय ग्रीन रुपया मुदत ठेव ऑफर केली जात आहे. तुम्ही या FD योजनेमध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये कमाल मर्यादा नाही. यामध्ये तीन मुदतीची एफडी दिली जात आहे. 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या FD मध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 6.65 टक्के आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.15 टक्के व्याज दिले जात आहे. 2222 दिवसांच्या FD मध्ये गुंतवणूकदारांना 6.40 टक्के तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.40 टक्के व्याज दिले जात आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रीन टाइम डिपॉझिट ( Central Bank Cent Green Time Deposit Scheme )
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ग्रीन टाईम डिपॉझिट ऑफर केले जात आहे. बँक 1111 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 5.90 टक्के, 2222 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 6.00 टक्के आणि 3333 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 6.10 टक्के व्याज देत आहे.
AU ग्रीन मुदत ठेव ( AU Green Fixed Deposit )
AU स्मॉल फायनान्स बँकेद्वारे AU ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट FD ऑफर केली जात आहे. यामध्ये एक वर्ष ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. बँक 12 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 6.75 टक्के, 18 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 8 टक्के, 36 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 7.50 टक्के, 60 महिन्यांच्या आणि 120 महिन्यांच्या ग्रीन एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :