Best Saving Scheme for Daugthers : जर तुम्हालाही मुलगी असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करु शकता. सरकारी योजनांसोबतच तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवू शकता. पण तुमच्या मुलीसाठी कोणती गुंतवणूक योजना सर्वोत्तम आहे. मुलीच्या उज्ज्वल भविष्य तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरेल, कोणत्या योजनेत तुमच्या मुलीला जास्त परतावा मिळेल याबाबत सविस्तर जाणून घ्या.


सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किती व्याज? ( SSY - Sukanya Samriddhi Yojana )


सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठीची सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यास मदत करते. सुकन्या समृद्धी योजना (SSY) 8.2 टक्के दराने व्याज देत आहे. हे व्याज सरकारकडून दर तिमाहीला मिळते आणि त्यात बदलही केले जात आहेत. तुम्ही ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त 250 रुपयांपासून सुरू करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत कधीही उघडता येते. यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता.


इक्विटी, म्युच्युअल फंड परतावा (Equity Mutual Fund)


AMFI डेटानुसार, इक्विटी म्युच्युअल फंडांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना अतिशय भरघोस परतावा दिला आहे. निप्पॉन इंडियाच्या व्हॅल्यू फंडाने गुंतवणूकदारांना 42.38 टक्के परतावा मिळाला आहे. याशिवाय आदित्य बिर्ला सन लाइफ प्युअर व्हॅल्यू फंडाने 43.02 टक्के परतावा दिला आहे. तर, ॲक्सिस व्हॅल्यू फंडाने 40.16 टक्के परतावा दिला आहे, तर SBI लाँग टर्म इक्विटी फंडातून गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा मिळाला आहे.


सुकन्या समृद्धी योजना VS इक्विटी म्युच्युअल फंड


आता सुकन्या समृद्धी योजना आणि इक्विटी म्युच्युअल फंड यापैकी कोणती योजना अधिक फायदेशीर आहे, जाणून घ्या. सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक सरकारी योजना आणि निश्चित उत्पन्न देणारी योजना आहे. तर दुसरीकडे, म्युच्युअल फंड हे एक साधन आहे ज्याद्वारे आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंडमध्ये धोका आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत, म्हणजेच लॉकिन कालावधी होईपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तर, म्युच्युअल फंड गुंतवणूक जोखीमेची आहे.


(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mahila Samman Bachat Yojana : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा? तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या