Financial Planning And Saving : अनेकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाही. त्याशिवाय कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता असते. योग्य प्रकारे नियोजन केल्यास पैशांची बचत होण्यास मदत होईल. त्याशिवाय तुमच्या डोक्यावर असलेले कर्जदेखील टप्प्याटप्प्याने कमी होईल. 


तुम्ही तुमच्या घराचे मासिक बजेट तयार करा. यामध्ये तुमचा सर्व खर्च समाविष्ट करा. या खर्चामध्ये किराण्याचे सामान, छोट्या गोष्टींसाठी होणारा अंदाजित खर्च याचाही समावेश करा. यामुळे महिन्याकाठी किती खर्च होतो याचा अंदाज येईल. त्यानुसार तुम्हाला बचतीच्या दृष्टीने पावले उचलता येऊ शकतात. तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाचेही नियोजन करा. आर्थिक बचतीच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. तुमच्या मासिक उत्पन्नातील किमान 50 टक्के रक्कम ही बचतीच्या अनुषंगाने ठेवता येईल असे नियोजन करावे. तुमच्या मासिक उत्पन्नातील 30 टक्के रक्कम ही आपात्कालीन परिस्थितीत अचानक एखादा प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी असावा. तर, 20 टक्के रक्कम ही भविष्यातील तरतुदींसाठी ठेवावी. यामध्ये म्युच्युअल फंड्स, आरडी इतर ठिकाणी तुम्हाला पैसे गुंतवता येऊ शकतील. ही गुंतवणूक आर्थिक सल्लागाराच्या मदतीने करावी. जेणेकरून यातील जोखीम कमी होऊ शकते आणि भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. 


वीज बिल, फोन बिल, जेवण, अन्नधान्य आदींसाठी होणाऱ्या खर्चाची नोंद करून ठेवा. यामुळे तुम्ही किती अनावश्यक खर्च करता हे लक्षात येईल. दरमहा होणारा अनावश्यक खर्च तुम्हाला टाळता येऊ शकतो. भविष्यात हा खर्च टाळता येईल आणि तुमच्या बचतीमध्ये वाढ होईल किंवा हेच पैसे तुम्ही इतर कामासाठी खर्च करू शकता. 


सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर सर्रास केला जातो. मात्र, क्रेडिट कार्डचा वापर आणीबाणीच्या स्थितीत करावा. क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळावा. लहान किंवा अनावश्यक खर्च हा क्रेडिट कार्डद्वारे न करण्यावर भर द्यावा. त्याशिवाय, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे. क्रेडिट कार्डचा हप्ता चुकल्यास व्याज आकारणी होते. त्याशिवाय, क्रेडिटचा वापर करून रोख रक्कम काढू नये. या रक्कमेवर व्याज आकारणी होत असते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवावा. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha