Aadhaar Card : तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही, झटपट तपासा; स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
Aadhaar Bank Account Link Status : तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावं लागेल, याची सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या.
Bank Aadhaar link Status : आजच्या काळात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्याशी (Bank Account) लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक (Aadhaar Bank Account Link Status) नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमचा आधार बँकेशी लिंक असेल तर तुम्ही आधारच्या माध्यमातून बँकेशी व्यवहार सहज करू शकता.
तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही?
आधार हा 12 अंकी यूनिक आइडेंटिफिकेशन नंबर आहे, जो अनेक कामांमध्ये वापरला जातो. सध्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडताना आधारची माहिती आणि केवायसी देणे बंधनकारक आहे. याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामं ठप्प होऊ शकतात. अलीकडे हिमाचल प्रदेशातील 12,000 मुलांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही, कारण त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नव्हते. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया नेमकी काय ते पाहा.
स्थिती कशी तपासायची?
आरबीआयच्या नियमांनुसार, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर, तुम्ही सर्व खाती आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया 'MyAadhaar' च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तुमची कोणती बँक खाती आधार कार्डशी लिंक आहेत, हे तुम्ही सहज तपासू शकता. जर तुम्हाला ते तपासायचे असेल तर, आम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही, असं तपासा
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर क्लिक करा.
- पुढे My Aadhaar टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि आधार सेवा निवडा.
- आधार सेवा विभागात जा आणि आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा.
- पुढील पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक दिसेल.
- पुढे Send OTP वर क्लिक करा आणि येथे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
- OTP टाकल्यानंतर, तुम्हाला लगेच कळेल की तुमचे आधार कोणते बँक खाते लिंक आहे.
बँक खाते लिंक नसल्यास काय करावं?
तुमचे खाते आधार कार्डशी लिंक झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बँकेतही जाऊ शकता. खात्याशी आधार लिंक नसल्यास, तुम्ही बँकेत आधार लिंक फॉर्म भरा. तुमची आधार आणि पॅन संदर्भातमाहिती द्या. केवायसी करा आणि त्यानंतर काही मिनिटांत तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होईल.