EPFO Interest : ईपीएफ धारकांना दिवाळी गिफ्ट! व्याजाचे पैसे मिळणार, जमा रक्कम कशी तपासाल?
EPFO Interest for FY 2022-23 : ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम कशी तपासाल? जाणून घ्या.
EPFO Interest for FY 2022-23 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी (Diwali 2023) भेट दिली आहे. ईपीएफओ (EPFO) ने 2022-23 या आर्थिक वर्षातील व्याजदर (EPFO Interest) खात्यांमध्ये (EPFO Account) हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. या आर्थिक वर्षात (Financial Year), EPFO खातेधारकांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर (EPFO Interest Rate for FY 2022-23) 8.15 टक्के व्याज दर देत आहे.
EPFO कडून पीएफ व्याज ट्रान्सफर करण्यास सुरुवात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाद्वारे ठरवले जातात. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जून 2023 मध्ये नवे व्याजदर जाहीर केले होते. यानंतर सरकारने व्याजदराचे पैसे पीएफ खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
ईपीएफओने यासंदर्भात दिली माहिती
ईपीएफओ धारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे कधी जमा केले जातील, याबाबत अनेक पीएफधारकांनी सोशल मीडियावर ईपीएफओकडे विचारणा केली. ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी ट्रान्सफर केले जातील यासंदर्भात माहिती दिली आहे. सुकुमार दास नावाच्या युजरने ईपीएफओला या संदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ईपीएफओनं, ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. खातेधारकांना या वर्षी कोणतेही नुकसान न होता संपूर्ण व्याजाची रक्कम मिळेल, असं सांगत ईपीएफओने कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्याची विनंती केली आहे.
The process is in pipeline and may be shown there very shortly. Whenever the interest will be credited, it will be accumulated and paid in full. There would be no loss of interest. Please maintain patience.
— EPFO (@socialepfo) November 10, 2023
पीएफ खात्यातील रक्कम कशी तपासायची?
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सहज करू शकता. यासाठी तुम्ही मेसेज (Message), मिस्ड कॉल (Missed Call), उमंग अॅप (Umang App) किंवा ईपीएफओ (EPFO) वेबसाइटची मदत घेऊ शकता. संदेशाद्वारे शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या EPFO नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर संदेश (Message) पाठवावा लागेल. याशिवाय तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल (Missed Call) पाठवूनही पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. EPFO पोर्टलवर जाऊनही तुम्ही पीएफ अकाऊंटमधील बॅलन्स तपासू शकता.
तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी आधी तुमच्या मोबाईलमध्ये उमंग अॅप (Umang App) वर अॅप डाउनलोड करा. यानंतर, EPFO विभागात जा आणि सर्व्हिस पर्याय निवडा आणि पासबुक पहा. यानंतर, कर्मचारी - केंद्रित सेवेवर जा आणि OTP पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि प्रविष्ट करा. यानंतर, काही मिनिटांतच तुमच्यासमोर EPFO पासबुक उघडेल, ज्यावर तुम्ही शिल्लक रक्कम तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :