EPFO : तुमच्या पीएफ अकाऊंटला (PF Account) लिंक असलेला मोबाईल नंबर (Mobile Number) जर तुम्हाला बदलायला असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या पीएफ अकाऊंटला (EPFO Account) लिंक असलेला जुना मोबाईल नंबर बदलून जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा असेल, तर यासाठीची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


मोबाईल नंबर PF अकाऊंटसोबत लिंक करायचाय?


नोकरदारांच्या पगारातील काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. कर्मचार्‍यांच्या पीएफ अकाऊंटसंबंधित माहिती, शिल्लक रक्कम आणि योगदान यासंबंधीची माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविली जाते. जर तुम्ही पीएफ अकाऊंटशी जोडलेला तुमचा नवीन नंबर अपडेट केला नसेल, तर तुम्हाला पीएफ शिल्लक आणि मासिक योगदानाबद्दल माहिती मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हालाही पीएफ अकाऊंटला जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा नवीन मोबाईल नंबर जोडायचा असेल, तर यासाठी ओक सोपी पद्धत आहे.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) द्वारे नोकरदार वर्गाकडून दर महिन्याला ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफच्या रूपात नोकरदारांना चांगला परतावा मिळतो. कर्मचारी आपात्कालीन परिस्थिती आवश्यक असल्यास ईपीएफमधून पैसेही काढू शकतो. 


मोबाईल क्रमांक ईपीएफ खात्याशी लिंक असणं गरजेचं


ईपीएफ अकाऊंट संबंधित कोणतेही काम करण्यासाठी कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक त्याच्या ईपीएफ खात्याशी लिंक असायला हवा पाहिजे. तुम्ही जर तुमचा मोबाईल नंबर लिंक केला नसेल, तर तो लगेच तुमच्या ईपीएफ खात्याशी लिंक करून घ्या. ईपीएफची रक्कम काढण्यासाठीही नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जातो. जर तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ईपीएफ खात्याशी जोडायचा म्हणजेच लिंक करायचा असेल, तर तुम्ही येथे सांगितलेल्या पद्धतीने मोबाईल नंबर लिंक करु शकता, कसं ते जाणून घ्या.


EPF अकाऊंटसोबत मोबाईल नंबर कसा लिंक कराल?



  • तुमच्या ईपीएफ अकाऊंटसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात आधी EPF इंडियाची अधिकृत वेबसाईट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php ला भेट द्या.

  • यानंतर 'फॉर एम्पलाइज' (For Employees) हा पर्याय निवडा.

  • आता युएएन/ऑनलाईन सेवा (UAN/Online Service) या पर्यायावर क्लिक करा.

  • UAN आणि पासवर्डद्वारे लॉगिन करा. यानंतर OTP प्रविष्ट करावा लागेल.

  • यानंतर 'संपर्क तपशील' (Contact Details) यावर क्लिक करा.

  • शेवटी सत्यापित (Verify) करा आणि मोबाईल नंबर बदला (Change Mobile Number) या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करा. Get OTP वर क्लिक करा आणि OTP सबमिट करा.


 महत्वाच्या इतर बातम्या : 


EPFO Update : UAN नंबरशिवाय PF अकाऊंटवरून काढता येतील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया