Aadhaar Card Free Update Last Date : आधार कार्ड (Aadhaar Card) हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्रे (Important Document) असून हे अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमची अनेक कामं अडकू शकतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. या तारखेनंतर आधार कार्ड अपडेट करणाऱ्यांना शुल्क भरावं लागेल, असंही सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे अंतिम तारखेच्या आधी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु असताना सरकारने दिलासा दिला आहे. आधार कार्ड अपडेट बाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची 14 डिसेंबर ही मुदत आता वाढवण्यात आली आहे.
आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख
सरकारने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. या आधी केंद्र सरकारने जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. UIDAI वेबसाइटवर जाऊन मोफत आधार अपडेट करण्यासाठी सरकारने सांगितलं होतं आणि यासाठी 14 डिसेंबर 2023 ही मुदत दिली होती. आता ही मुदत 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
आधार कार्ड अपडेट कसं करायचं?
UIDAI वेबसाइटवर तुम्ही ऑनलाईन अपडेट करू शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही तुमचं आधार कार्ड मोफत अपडेट करु शकता. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला पैसे मोजावे लागतील, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, आजच तुमचं आधार कार्ड अपडेट करुन घ्या.
आधार कार्ड कुठे अपडेट करायचं?
तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आधार केंद्रावर लांब रांगेत ताटकळत थांबावं लागणार नाही. तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने या दोन पद्धतीने अपडेट करु शकता. तुम्ही आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही माहिती अपडेट करु शकता.
'ही' माहिती मोफत अपडेट होईल
UIDAI आधारमध्ये काही गोष्टी अपडेट करण्यासाठी शुल्क आकारलं जातं. पण, आता 14 मार्च 2024 पर्यंत या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सरकारने 14 डिसेंबर 2023 ही मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे.
- 5 वर्षे, 15 वर्षे आणि 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीचे बायोमेट्रिक आधार अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते.
- डेमोग्राफिक डेटासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.
- बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.
- डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क
- आधार डाउनलोड आणि कलर प्रिंटवर 30 रुपये शुल्क
- ओळख आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क
- पिन आधारित पत्ता अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क
महत्त्वाच्या इतर बातम्या :