SGB Scheme 2023-24 : सोने खरेदी (Gold) करण्याच्या किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोनं खरेदी करू शकता आणि तेही थेट सरकारकडून. हो, तुम्ही वाचताय ते खरं आहे. स्वस्तात सोने खरेदीचा उत्तम उपाय म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond). तुम्ही सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवून स्वस्तात सोने खरेदी करुन नफाही कमावू शकता. डिसेंबर महिन्यात सॉव्हरिन गोल्ड बाँडचा (Sovereign Gold Bond Scheme) तिसरा हप्ता जारी होणार आहे आणि यामध्ये तुम्ही स्वस्तात सोनं विकत (Buy Gold) घेऊन सरकारी योजनेद्वारे सोन्यामध्ये गुंतवणूक (Digital Gold) करू शकाल. स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी फक्त पाच दिवसांसाठी मिळेल. त्यामुळे ही सुवर्णसंधी दवडू नका.
18 डिसेंबरला हप्ता सुरू होईल
सरकारच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB योजना) चा तिसरा हफ्ता जारी करण्यात येणार आहे. ही योजना आरबीआयकडून चालवली जाते. 18 डिसेंबरला आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बाँड (SGB Scheme) चा तिसरा भाग जारी होईल. यामध्ये पाच दिवसांसाठी म्हणजेच 22 डिसेंबरपर्यंत खरेदी करता येईल. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, सरकार बाजारात प्रचलित सोन्याच्या किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी देते. याशिवाय आर्थिक वर्षाचा चौथा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल आणि त्यासाठी 12 ते 16 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, या वर्षाचा पहिला हप्ता 19 जून ते 23 जून, तर दुसरा हप्ता 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत खुला झाला होता. 2015 मध्ये सुरू केलेल्या पहिल्या हप्त्याच्या मॅच्युरिटीवर, गुंतवणूकदारांना 8 वर्षांत 12.9 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
सोन्याचा भाव अद्याप ठरलेला नाही
दरम्यान, सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात जारी केलेल्या हप्त्यादरम्यान, सरकारने प्रति ग्रॅम 5,923 रुपये या दराने सोने विकले होते. या योजनेंतर्गत सरकारकडून विकलं जाणारं सोनं हे डिजिटल सोने आहे. या योजनेमध्ये किती प्रमाणात सोने कोणत्या दराने खरेदी करत आहात, याचे प्रमाणपत्र गुंतवणूकदारांना दिले जाते. खरं सोनं विकत घेण्यापेक्षा हे डिजिटल सोने खरेदी करून चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे.
SGB योजनेअंतर्गत, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून जारी केलेल्या गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली जाते. सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते आणि हा एक खात्रीशीर परतावा आहे. याशिवाय, सरकार या योजनेअंतर्गत सोने खरेदीवर निश्चित दरावर अतिरिक्त सवलत देखील देते.
2015 मध्ये सुरू झाली योजना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरिन गोल्ड बाँड सुरू केली होती, ज्याच्या पहिल्या हप्त्याची मुदत पूर्ण झाली आहे. आठ वर्षांत 12.9 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने ही शासकीय सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) सुरू केली होती. ही योजना सरकारी असल्यामुळे गुंतवणुकीवर सरकारकडून सुरक्षिततेची हमी मिळते.
गुंतवणूकदार हे डिजिटल सोने बाँडच्या माध्यमातून खरेदी करू शकतात आणि खरेदी केलेल्या सोन्याच्या रकमेसाठी गुंतवणूकदारांना समान किमतीचे सॉव्हरिन गोल्ड बाँड जारी केले जातात. त्याची मॅच्युरिची कालावधी 8 वर्षे आहे. पण, तुम्हाला 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता.
ऑनलाइन खरेदीवर स्वतंत्र सूट
एसजीबी म्हणजेच सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सूटही दिली जाते. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही 1 ग्रॅम सोन्यातही गुंतवणूक करू शकता. योजनेअंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 500 ग्रॅम गोल्ड बाँड खरेदी करू शकते. हे गोल्ड बाँड लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) द्वारे विकले जातात.
सॉव्हरिन गोल्ड बाँड म्हणजे काय?
सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) म्हणजे एसजीबी (SGB) एक गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. दर यामध्ये मेकिंग चार्ज, जीएसटीची कटकट नसते. सॉव्हरिन गोल्ड बाँड हा एक सरकारी बाँड आहे. सरकारनं 2015 मध्ये ही योजना सुरु केली होती. यामध्ये तुम्ही डिजिटल रुपात सोने (Digital Gold) खरेदी करु शकतो. जर हे बाँड 5 ग्रॅमचे असतील तर याची किंमत 5 ग्रॅम सोन्याच्या बरोबरीनं असते.