मुंबई : तंत्रज्ञानामुळे सगळं काही आधुनिक झालं असलं तरी याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आजकाल सामान्य लोकांची फसणूक होत आहे. या फसवणुकीचे प्रमाण हल्ली चांगलेच वाढले आहे. एटीएम मशीन्सच्या येण्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पण याच एटीएम मशीन्ससोबत छेडछेड करून आतापर्यंत कितीतरी लोकांची फसवणूक झालेली आहे. सध्या असाच एक नवा फ्रॉड (ATM Machine Fraud) चर्चेचा विषय ठरतोय. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक आजकाल लोकांना वेगळ्या पद्धतीने लुटत आहेत.
अशा पद्धतीने होते लुबाडणूक
तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तुमचे कार्ड अडकले असेल तर साधव राहा. कारण अशा स्थितीत मदत करण्याच्या बहाण्याने काही लोक तुमच्या बँकेतून पैसे काढून घेऊ शकतात. हा घोटाळा करताना एटीएम मशीमधील तुमच्या कार्डसंदर्भातील माहिती हटवली जाते. त्यानंतर तुम्ही चुकून एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यास ते मध्येच अडकून बसते. त्यानंतर चोरटे तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याकडून एटीएम पीन विचारून घेतात. त्यानंतर एटीएम कार्ड काम करत नसल्यामुळे बँकेत तक्रार करायला जा असं सांगतात. याच काळात चोरटे तुमच्या कार्डचा पीन कोड टाकून तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतात. त्यामुळे एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
या सात मार्गाने घ्या काळजी
- एखाद्या एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) पैसे काढण्यासाठी जात असाल तर ते स्थळ लक्षात ठेवा
- पैसे काढताना तुमच्यासोबत आत कोणीही नाही, याची खात्री करून घ्या.
- एटीएम मशीमध्ये तुमचा पीन कोड टाकताना वर हाताने झाकून घ्या. तो पीन कोणालाही दिसायला नको.
- पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका
- एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर मोबाईलमध्ये मसेज, स्टेटमेंट चेक करा
- तुम्ही फसवले जाऊ शकता, असे वाटत असेल तर तेथून पैसे काढू नका
- तुम्हाला फसवून तुमच्या खात्यातील पैसे काढण्यात आले, किंवा फसवणूक होण्याची शक्यता असेल तर पोलिसांना माहिती द्या.
हेही वाचा :
प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी नवा नियम, सिलिंडर महागणार का? येत्या 1 मे पासून काय काय बदलणार?
आता शेतकरीही होऊ शकतात करोडपती, फक्त करावी लागेल 'ही' शेती; जाणून घ्या सविस्तर