मुंबई : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे सर्वच प्रवासी वाहतुकींवर मोठा ताण असतो. विमानसेवा असेल, रेल्वे असेल किंवा बस सेवा असेल प्रवाशांची गर्दी ठरलेलीच असते. मात्र, प्रवाशांच्या याच गर्दीचा फायदा घेत अनेक ट्रॅव्हल्स एजन्सीकडून प्रवास भाड्यात वाढ केली जाते. अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास देऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. मात्र, पेटीएम (Paytm) या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने सणासुदीसाठी खास पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलच्या लाँचची घोषणा केली. या ट्रॅव्हल कार्निवलदरम्यान ट्रॅव्हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्ह सूट देण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास 5000 रूपयांची बचत करू शकतात आणि बस (Bus) बुकिंग्जवर 25 टक्के सूट म्हणजेच जवळपास 500 रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे, प्रवाशांचा प्रवास सुकर आणि स्वस्तातला होणार आहे.
कंपनीने वापरकर्त्यांना अतिरिक्त बचत देण्यासाठी आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ बडोदा आणि एयू स्मॉल फायनान्स बँक अशा आघाडीच्या बँकांसोबत सहयोग केला आहे. प्रवासी देशांतर्गत फ्लाइट्सवर जवळपास 15 टक्के सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर जवळपास 10 टक्के सूटचा लाभ घेण्यासाठी प्रोमो कोड्सचा वापर करू शकतात, जसे आयसीआयसीआय बँकेसाठी 'आयसीआयसीआयसीसी', आरबीएल बँकेसाठी 'फ्लायआरबीएल', बँक ऑफ बडोदासाठी "बॉबसेल" व एयू स्मॉल फायनान्स बँकेसाठी 'एयूसेल. तसेच, पेटीएमची तिकिट अशुअर सेवा कन्फर्म रेल्वे तिकिटांची खात्री देते, तर बुकिंग्ज यूपीआयच्या माध्यमातून विनाशुल्क दिल्या जातात. वापरकर्ते रेल्वे तिकिटांसाठी फक्त 49 रूपयांपासून मोफत कॅन्सलेशनचा देखील अवलंब करू शकतात.
कंपनीच्या या कार्निवलबद्दल सांगताना पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, ''सणासुदीचा काळ जवळ आला असताना आणि देशभरातील लोक त्यांच्या मूळगावी किवा सुट्टीतील धमालीसाठी प्रवासाचे नियोजन करत असताना आम्हाला विशेष ऑफर्स सादर करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक किफायतशीर व सुखकर होईल. आघाडीच्या बँकांसोबत सहयोगासह आमचा फ्लाइट्स, रेल्वे व बसेसवर बचत देण्याचा मनसुबा आहे, ज्यामधून लाखो पेटीएम वापरकर्ते विनासायास प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.'' दरम्यान, सणासुदीच्या काळात अनेक प्रवासी वाहतूक अॅप आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या देखील प्रवाशांना काही खास ऑफर देऊ शकतील. मात्र, प्रवाशांसाठी सर्वात पहिली ऑफर कार्निवलच्या माध्यमातून पेटीएमने सुरू केली आहे.
हेही वाचा
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव