एक्स्प्लोर

Indian Railways : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटाचे दर अर्ध्यावर आणले, लोकसभेपूर्वी केंद्र सरकारचा निर्णय

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवासी ट्रेनच्या भाड्यात 40 ते 50 टक्क्यांची कपात केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पॅसेंजर ट्रेनमधून (Passenger Trains) दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. दैनंदिन प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. या अंतर्गत रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये 10 ते 30 रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होते. 

भारतीय रेल्वेने 27 फेब्रुवारीपासून 'पॅसेंजर ट्रेन्स'चे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत केले आहे. त्यांना आता 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा 'डेमू एक्सप्रेस' गाड्या म्हणतात. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासी गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर किमान तिकिटाची किंमत 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आली. हे एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यानुसार होते. मात्र नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर ही किंमत अर्ध्यावर आली असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मेमू ट्रेनच्या भाड्यात कपात

रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि 'झिरो' पासून सुरू होणाऱ्या ट्रेन्ससाठी साधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे 50 टक्क्यांनी कपात केली आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमधील भाडे रचना देखील त्यानुसार बदलण्यात आली आहे. ज्यांचे आधी पॅसेंजर ट्रेन म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते आणि आता त्या देशभरात 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे 

तिकीट दर कमी करण्याची मागणी होती

अनेक गंतव्यस्थानांच्या तिकिटांचे दर आधीच्या निम्म्या दराने कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक तो दिलासा मिळाला आहे. बदललेले भाडे गुरुवारपासून लागू झाले आहे. हे भाडे कमी करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत होती. 

कोरोना साथीच्या रोगाच्या काळात गर्दी वाढू नये म्हणून अनेक पॅसेंजर गाड्या चार वर्षांपूर्वी तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर प्रवाशांना प्रवाशासाठी एक्स्प्रेसचे भाडे द्यावे लागले. तिकीट दर कमी करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांकडून सातत्याने होत होती. नुकत्याच झालेल्या भाडे कपातीचे प्रवाशांकडून चांगलेच कौतुक होत आहे. नवीन दरांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget