एक्स्प्लोर

पुढचा आठवडा ठरणार खास! तीन ब्रँड आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार; पैसे कमवण्याची जबरदस्त संधी!

आगामी आठवड्यात तीन मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना या आयपीओंमधून चांगला परतावा मिळवण्याची नामी संधी मिळणार आहे.

IPOs This Week: अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच आलेल्या काही आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स दिले आहेत. याच कारणामुळे आगामी काळात कोणता आयपीओ येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या पुढच्या आठवड्यात धामाकेदार तीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. हे सर्वच आयपीओ SME श्रेणीतील आहेत. यासह अगोदरपासूनच गुंतवणुकीसाठी खुल्या असलेल्या 7 IPO मध्येही पैसे गुंतवण्याची मोठी संधी असणार आहे. पुढच्या आठवड्यात एकूण 12 कंपन्यादेखील शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. यातील दोन कंपन्या या मेनबोर्ड सेगमेंटच्या आहेत. 

तीन नवे आयपीओ येणार

Subam Papers IPO: हा आयपीओ एकूण 93.70 कोटी रुपयांचा असेल. तो  30 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होईल. तर 3 ऑक्टोबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. ही कंपनी BSE SME वर 8 ऑक्टोबर रोजी लिस्ट होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 144 ते 152 रुपये प्रति शेअर असणार आहे. एका लॉटमध्ये 800 शेअर्स असतील.

Paramount Dye Tec IPO: हा आयपीओ 28.43 कोटी रुपयांचा असेल. येत्या 30 सप्टेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. तर NSE SME वर 8 ऑक्टोबर रोजी हा शेअर सूचिबद्ध होईल. या आयपीओचा किंमत पट्टा  111 ते 117 रुपये असून एका लॉटमध्ये 1200 शेअर्स असतील. 

NeoPolitan Pizza and Foods IPO: हा आयपीओ 30 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 12 कोटी रुपये उभे करणार आहे. 20 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने तुम्हाला एका लॉटमध्ये 6000 शेअर्स घ्यावे लागतील. हा शेअर BSE SME वर 9 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होणार आहे. 

गुंतवणुकीसाठी खुले असलेले आयपीओ 

Nexxus Petro Industries IPO: एकूण 19.43 कोटी रुपयांचा हा आयपीओ 26 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालेला आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. आतापर्यंत हा आयपीओ 1.70 पटीने सबस्क्राईब झाला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. या आयपीओतील एका एका शेअरचे मूल्य हे 105 रुपये असून एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत. 

Diffusion Engineers IPO: हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 26 सप्टेंबर रोजी खुला झालेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. कंपनी या आयपीओच्या माध्यातून 158 कोटी रुपये उभारणार आहे. आतापर्यंत हा आयपीओ 27.74 पट सबस्क्राईब झालेला आहे. ही कंपनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी BSE, NSE वर सूचिबद्ध होणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 159-168 रुपये प्रति शेअर असून एका लॉटमध्ये 88 शेअर्स आहेत.

Forge Auto International IPO: या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 31.10 कोटी रुपये उभे करणार आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. 26 सप्टेंबरपर्यंत हा आयपीओ 11.27 पटीने सबस्क्राईब झालेला आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 102-108 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत. हा आयपीओ 4 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल.  

Sahasra Electronics Solutions IPO: हा आयपीओ 26 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 186.16 कोटी रुपये उभे करणार आहे. हा आयपीओ आतापर्यंत 13.94 पटीने सबस्क्राईब झालेला आहे. ही कंपनी NSE SME वर 4 ऑक्टोबर रोजी सूचिबद्ध होणार असून या आयपीओच्या शेअरचा किंमत पट्टा 269-283 रुपये आहे. एका लॉटमध्ये तुम्हाला 400 शेअर्स घ्यावे लागतील. 

Divyadhan Recycling Industries IPO: हा आयपीओ एकूण 24.17 कोटी रुपयांचा आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ आतापर्यंत 4.89 पटीने सबस्क्राईब झालेला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार असून प्रत्येक शेअरचा किंमत पट्टा 60-64 रुपये आहे. एका लॉटमध्ये एकूण 2000 शेअर्स आहेत. 

HVAX Technologies IPO: या आयपीओत तुम्हाला 1 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 33.53 कोटी रुपये उभे करणार आहे. हा आयपीओ आतापर्यंत 1.13 पटीने सबस्क्राईब झालेला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला आहे. या आयपीओतील शेअरचा किंमत पट्टा 435-458 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओत एका लॉटमध्ये 300 शेअर्स आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

मोठी बातमी! रिलायन्स-डिज्ने यांच्यातील 71 हजार कोटींच्या कराराला केंद्र सरकारची मंजुरी

राजू शेट्टी ते हास्यजत्रा फेम निखील बने, दिग्गजांना हवंय म्हाडाअंतर्गत मुंबईत घर; 2030 घरांसाठी 1 लाख 13 हजार अर्ज पात्र!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget