Pakistan News : पाकिस्तानच्या (Pakistan) मागील संकट काही केल्या कमी होत नाहीत. दिवसेंदिवस आर्थिक संकट (financial crisis) वाढतच आहेत. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणेच पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळं पाकिस्तान विविध देशांकडे आर्थिक मदत मागत आहे. अशातच पाकिस्तानला IMF कडून 9000 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. यामुळं दिवसेंदिवस पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे.


देश मोठ्या आर्थिक संकटात


दरम्यान, IMF ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला 9000 कोटी रुपयांची मदत करण्याचा करार IMF च्या विचारधीन आहे. यापूर्वी देखील IMF ने पाकिस्तानला आर्थिक मदत केली होती. मागील वर्षी तीन अब्ज डॉलर्सच्या मदत IMF ने केली होती. दरम्यान, पाकिस्तानला आता 9000 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे, ही दिलासादायक बातमी आहे. देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला मदतीची खूप गरज होती. दरम्यान, IMF ने दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि सरकार हे तेथील आर्थिक स्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करत आहेत. टिकाऊ अर्थव्यवस्था करण्यासाठी सरकारच्या वतीनं विविध धोरणं देखील राबवली जात असल्याची माहिती IMF ने दिली आहे. 


पाकिस्तानला कधी मिळणार 9000 कोटी


पाकिस्तानला  IMF कडून 9000 कोटी रुपये मिळण्याचा करार अंतिम टप्प्यात आहे. सध्या यावर चर्चा देखील सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IMF बोर्ड एप्रिल महिन्याच्या शेवटी  ही 9000 कोटी रुपयांची मदत करु शकते. दरम्यान, सध्या आर्थिक स्थिती पाहता पाकित्सानने वीज आणि गॅसच्या दरात वाढ केली आहे. तसचे अन्य काही वस्तूंवर टॅक्स देखील लावले आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला मात्र, मोठा फटका बसत आहे. दरम्यान, IMF ने पाकिस्तानला मदत दिल्यानंतर तरी देशाची आर्थिक स्थिती सुधारणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.


पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा वाढला


दिवसेंदिवस पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा आणखी वाढत जाणार आहे. पाकिस्तानने आयएमएफकडे आणखी कर्जाचे पॅकेज मागितले आहे. याशिवाय देशात राजकीय स्थिरतेचे वातावरण नाही. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय आघाडीवर अपयशी ठरताना दिसत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या मते, या परिस्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बाह्य कर्ज आणि व्याजाचा भरणा हे आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पाकिस्तान बुडाला कर्जाच्या गर्तेत, IMF कडे पुन्हा मागितली कर्जाची मदत