Pooja Bhatt On Mahesh Bhatt :  आपल्या चित्रपटांनी बॉलिवूडवर छाप सोडणारे दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhatt) यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांची पहिली मुलगी पूजाच्या जन्मानंतर मोठ्या आर्थिक अडचणीत ते सापडले होते. त्यांची मुलगी पूजा भट (Pooja Bhatt) हिनेच याबाबत एक भाष्य केले. 


अभिनेत्री पूजा भट हिची वेब सीरिज 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' ला ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या नुकतेच एका मुलाखतीत पूजाने आपले वडील महेश भट यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला. पूजा भटने सांगितले की, ज्यावेळी तिचा जन्म झाला त्यावेळी महेश भट यांना नोकरी गमवावी लागली. ते कोणताही चित्रपट बनवत नव्हते  आणि भावनिकदृष्ट्या ते खचले होते.  


पूजा भटने सांगितले की, माझा जन्म झाला त्यावेळी महेश भट यांनी माझ्यासाठी एक पत्र लिहिले होते. या पत्राच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या भाषणातील एक अंश होता. तुम्ही आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग निवडावा. कोणत्याही भीती शिवाय एखादे कार्य पार पाडा अशा आशयाचे स्वामी विवेकानंद यांचा कोट होता, असे पूजाने सांगितले. महेश भट यांनी माझ्यासाठी लिहिलेले हे पत्र मौल्यवान असल्याचे पूजा भटने सांगितले. 






त्यांनी त्या पत्रात ज्या गोष्टी सांगितल्या, त्या मी आयुष्यात आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नेहमी रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पूजाने सांगितले. महेश भट हे माझे शिक्षक  आहे, मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत असेही तिने सांगितले. 


वयाच्या 26 व्या वर्षी दिग्दर्शनात पदार्पणात


महेश भट यांनी वयाच्या 26 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवले. मंझिले और भी है या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात कबीर बेदी आणि प्रेरणा यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर 1979 मध्ये शबाना आझमी आणि विनोद खन्ना यांची भूमिका असलेला 'लहू के दो रंग' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.