Oxfam Report : जगातील सर्वात 5 श्रीमंत व्यक्तींनी दररोज 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 8.3 कोटी रुपये खर्च केले, तरी त्यांना त्यांचे सर्व पैसे संपायला 476 वर्षे लागतील. एका नवीन अहवालानुसार (Oxfam Report) ही माहिती समोर आली आहे. हे टॉप-5 अब्जाधीश नोव्हेंबर 2023 च्या शेवटी फोर्ब्सनं जाहीर केलेल्या यादीतून घेतले आहेत.यामध्ये एलन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब, जेफ बेझोस, लॅरी एलिसन आणि वॉरेन बफे यांचा समावेश आहे. या प्रत्येकाच्या संपत्तीचे विश्लेषण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
पाच श्रीमंत लोकांची संपत्ती 405 अब्ज डॉलरवरुन 869 अब्ज डॉलरवर
UK-आधारित संस्था Oxfam च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगातील पाच सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती 2020 पासून 405 अब्ज डॉलरवरुन 869 अब्ज डॉलर झाली आहे. दर तासाला 14 दशलक्ष डॉलर दराने, संपत्ती वाढत आहे. तर जवळपास पाच अब्ज लोक गरीब झाल्याची माहिती अहवालात सांगण्यात आली आहे. जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर जगाला दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत पहिला ट्रिलियनियर दिसेल, परंतु गरिबी आणखी 229 वर्षे संपणार नसल्याची माहिती Oxfam च्या अहवालात दिली आहे.
महिलांपेक्षा पुरुषांकडे अधिक संपत्ती
ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही असमानता अपघाताने उद्भवली नसल्याचं म्हटलं आहे. अब्जाधीश वर्ग त्यांना प्रत्येकाच्या खर्चावर अधिक पैसे मिळतील याची खात्री करत आहे. अब्जाधीश आता 2020 च्या तुलनेत 3.3 ट्रिलियन डॉलर किंवा 34 टक्के श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती महागाईच्या दरापेक्षा तिप्पट वेगाने वाढत आहे. जागतिक स्तरावर पुरुषांकडे महिलांपेक्षा 105 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे. हे अंतर यूएस अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा चार पट जास्त आहे. जगभरातील लोक दीर्घकाळ काम करत आहेत. बहुतेकदा अनिश्चित आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये गरिबीच्या वेतनासाठी जवळपास 800 दशलक्ष कामगारांच्या वेतनाने चलनवाढीचा वेग राखला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना 1.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.
आणखी 229 वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही
गेल्या काही वर्षांत जगभरात आर्थिक विषमता झपाट्याने वाढली (Economic disparity increased) आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील वाढत्या दरीबाबत एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे काही लोक मोठ्या प्रमाणात श्रीमंत होत आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधी लोक गरीब होत असल्याचे अहवालात दिसून आले आहे. पुढील 229 वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही, अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: