Indian Aviation Industry: देशात दिवसेंदिवस हवाई प्रवास (Air travelers) करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. 2023 या वर्षात हवाई प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्याही 153 दशलक्ष म्हणजे 15.3 कोटी झाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, 2030 पर्यंत देशातील हवाई प्रवाशांची संख्येत दुपटीने वाढ होणार आहे. 2030 पर्यंच हवाई वाहतूककरणाऱ्यांची संख्या ही 300 दशलक्ष म्हणजेच 30 कोटी होईल असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.
हवाई प्रवासी वाहतुकीत वार्षिक 15 टक्क्यांची वाढ
देशात हवाई प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांची संख्या दरवर्षी वेगाने वाढत आहे. 2023 या वर्षात हवाई प्रवासी वाहतूक 153 दशलक्ष (15.3 कोटी) झाली आहे. 2030 पर्यंत देशातील हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट म्हणजे 30 कोटी होणार आहे. हैदराबादमध्ये विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमाला संबोधित करताना मंत्री शिंदे बोलत होते. देशांतर्गत हवाई वाहतूक कोविडपूर्व कालावधी ओलांडली आहे. गेल्या दशकात देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक वार्षिक 15 टक्के दराने वाढत आहे. तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक 6.1 टक्के दराने वाढत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
2040 पर्यंत भारताला 2840 नवीन विमानांची गरज भासणार
भारताची देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक बाजार सातव्या स्थानावर आहे. दोन्ही एकत्र केल्यास भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. एकीकडे, भारताचे नागरी विमान वाहतूक बाजार सतत वाढत आहे. 2040 पर्यंत भारताला 2840 नवीन विमानांची गरज भासणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या अनेक विमानांशिवाय भारताला 41,000 वैमानिक आणि 47,000 तांत्रिक कर्मचार्यांचीही गरज भासणार आहे. एअरबस सध्या भारतातून 750 दशलक्ष डॉलर किमतीची उपकरणे आयात करते, जी या दशकाच्या अखेरीस 1.5 अब्ज डॉलरपर्यंत वाढवली जाईल.
देशांतर्गत विमान प्रवासाची मागणी वाढली
एकीकडे भारतात देशांतर्गत विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. दुसरीकडे गो फर्स्टचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे इतर विमान कंपन्यांवर दबाव निर्माण झाला आहे. देशातील वाढत्या एव्हिएशन मार्केटला पाहता विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर विमान खरेदीच्या ऑर्डर दिल्या आहेत. टाटा समूहाच्या एअर इंडियाने 470 तर इंडिगोने 500 विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. गुरुवारीच, Akasa Air ने 150 नवीन Boeing 737 Max खरेदी करण्याची ऑर्डर देखील दिली आहे. त्यामुळं आता देशात विमानांची संख्या देखील वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: