LPG Price Hike : ऐन दिवळीच्या काळात देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. कारण आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आथा महागले आहेत.
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा ताजा दर काय?
दिल्ली - 1802 रुपये
कोलकाता - 1911.50 रुपये
मुंबई - 1754.50 रुपये
चेन्नई - 1964.50 रुपये
घरगुती गॅस सिलिंडरची नेमकी काय स्थिती?
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर काय?
दिल्ली - 803 रुपये
कोलकाता - 829 रुपये
मुंबई - 802.50 रुपये
चेन्नई - 818.50 रुपये
विमानप्रवास महागण्याची शक्यता
ऐन दिवळीच्या काळात विमानातूप प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसू शकतो. कारण तेल कंपन्यांनी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून विमानाचे इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत 3 हजार रुपये प्रति किलो या प्रमाणे वाढ केली आहे.
मेट्रो सिटीमध्ये ATF चा भाव किती (Domestice)
दिल्ली- 90,538.72 रुपये
कोलकाता- 93,392.79 रुपये
मुंबई- 84,642.91 रुपये
चेन्नई- 93,957.10 रुपये
हेही वाचा :
पीपीएफ स्कीम लय भारी! महिन्याला 12500 रुपये गुंतवून मिळवा तब्बल 4100000 रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?
नवा आयपीओ आला रे आला! जाणून घ्या प्राईस बँड किती? गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख काय?
बापरे बाप! 3 रुपयांचा शेअर एका दिवसात थेट 2,36,250 रुपयांवर; स्टॉक मार्केटमध्ये रचला नवा इतिहास