PPF Calculator: पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) ही एक केंद्र सरकार पुरस्कृत बचत योजना आहे. केंद्र सरकार पुरस्कृत असल्यामुळे या बचत योजनेत शून्य जोखीम आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला करबचतीचाही फायदा मिळतो. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 15 वर्षांत तब्बल 41 लाख रुपयांचं भांडवल उभं करू शकता. हे कसं शक्य आहे, ते जाणून घेऊ या...
तुम्ही या योजनेत दीर्घकालीन मुदतीसाठी पैशांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला या योजनेतून चांगले रिटर्न्स मिळतात. सध्यातरी केंद्र सरकार पीपीएफ या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7.1 टक्के व्याज देते. पीपीएफ खात्याच्या मॅच्यूरिटीची मुदत ही वर्षे आहे. 15 वर्षांची मुदत असली योजनेच्या गुंतवणुकीचा कालवधी वाढवता येतो.
कसे मिळणार 41 लाख रुपये?
पब्लिक प्रोव्हिडेंट फंडात तुम्ही प्रत्येक महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक केल्यास 15 वर्षांत 41 लाख रुपये मिळवण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होते. तुम्ही पीपीएफ योजनेत एका वित्तीय वर्षात कमीत कमी 500 रुपये 150000 रुपयांची गुंतवणूक करू शकता.
समजून घ्या तुम्हाला 41 लाख रुपये कसे मिळणार?
प्रतिमहिना गुंतवणूक : 12,500 रुपये
वार्षिक गुंतवणूक : 150000 रुपये
कालावधी : 15 वर्षे
व्याज दर: 7.1 टक्के
गुंतवलेली रक्कम : 2250000 रुपये
मिळणारे व्याज :1818209 रुपये
म्यॅच्युरिटीनंतर किती रुपये मिळणार : 4068209 रुपये
पीपीएफ खात्याचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. मात्र पाच-पाच वर्षांनी तुम्ही याचा कालावधी वाढवू शकता. पीपीएफ खात्यात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदा आहेत. यातील सर्वांत मोठा फायदा म्हणजे या योजनेत गुंतवलेली रक्कम ही 100 टक्के सुरक्षित असते. तुमचे नुकसान होण्याची शक्यता ही शून्य टक्के असते. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला प्राप्तिकर कायद्यानुसार करात सूट मिळते.
(या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. तुम्हाला प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि मगच गुंतवणूक करा.)
हेही वाचा :
नवा आयपीओ आला रे आला! जाणून घ्या प्राईस बँड किती? गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख काय?
घाई करा! सरकारी नोकर होण्याची मोठी संधी, तब्बल 65000 रुपये पगार मिळणार; वाचा अर्ज कसा करावा?