एक्स्प्लोर

NPCI चा मास्टरस्ट्रोक, सायबर गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम, UPI चं 'ते' फीचर 1 ऑक्टोबरपासून बंद होणार

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं बँका आणि पेमेंट ॲप्सला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून कलेक्ट रिक्वेस्ट बंद करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयनं सायबर गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयचा हा निर्णय सायबर गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक मानला जात आहे.

एनपीसीआयनं सर्व बँका आणि पेमेंटसप्सला (गुगल पे, फोन पे आणि पेटीएम) ला 1 ऑक्टोबर 2025 पासून यूपीआयवरील पीयर-टू-पीयर (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर हा सर्जिकल स्ट्राइक मानला जातोय. ज्यामुळं कोट्यवधी सामान्य यूपीआय वापरकऱ्यांचे पैसे सुरक्षित राहणार आहेत.

कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे काय?

कलेक्ट रिक्वेस्ट किंवा पूल ट्रांझॅक्शन हे यूपीआयचं फीचर आहे. ज्याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पैसे मागू शकता. उदा. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून 500 रुपये घ्यायचे आहेत. तेव्हा तुम्ही यूपीआयप्समध्ये तुमच्या मित्राचा यूपीआय आयडी टाकून त्याला 500 रुपयांची कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकता. यानंतर तुमच्या मित्राकडे त्याचं नोटिफिकेशन जातं. तिथून तो यूपीआय पिन टाकून ते मंजूर करेल तेव्हा 500 रुपये तुमच्या खात्यात येतील. हे फीचर नातेवाईकांना दिलेले पैसे परत घेण्यासाठी बनवण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी कलेक्ट रिक्वेस्ट चा वापर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला होता.

सायबर गुन्हेगार फोन करुन यूपीआय वापरकर्त्यांना लॉटरी, कॅशबॅक, नोकरी किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू विक्री करण्याच्या नावानं फसवणूक करायचे. ते सांगायचे तुम्हाला पैसे पाठवत आहोत, तुमच्या फोनवर आलेली रिक्वेस्ट मंजूर करा, ती रिक्वेस्ट मंजूर केल्यानंतर सामान्य यूपीआय वापरकर्त्यांची फसवणूक केली जायची.

लाखो लोकांची फसवणूक होत असल्यानं एनपीसीआयनं मोठं पाऊल उचललं आहे. एनपीसीआयन स्पष्ट केलं की 1 ऑक्टोबर 2025 नंतर यूपीआय P2P कलेक्ट ची यूपीआय प्रोसेस करता येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच्या यूपीआय वापरावर याचा परिणाम होणार नाही. ते नियमितपणे पेमेंट करु शकतात. P2P कलेक्ट रिक्वेस्ट बंद करण्यात आली असली तरी मर्चंट कलेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकतात.

जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्विगी, आयआरसीटीसी, एसटी तिकीट बुकिंग करत असाल आणि यूपीआय पेमेंट ऑप्शन निवडत असाल तर या कंपन्या तुमच्या यूपीआय ॲप वर एक पेमेंट रिक्वेस्ट पाठवतात. ती तुम्हाला पिन टाकून मंजूर करावी लागते.

एनपीसीआयनं यापूर्वी फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट ची मर्यादा घटवून 2000 रुपये प्रति व्यवहार केली होती. त्यामुळं फसवणुकीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गानं लोकांना फसवत होते. याला पायबंद घालण्यासाठी एनपीसीआयनं P2P कलेक्ट रिक्वेस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात यूपीआयचे 40 कोटी यूजर्स आहेत. दरमहा 1946 कोटींहून अधिक व्यवहार होतात.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget