मुंबई : रतन टाटा (Ratan Tata Death) यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा (Tata Trust) नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. रतन टाटा हे 1991 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आणले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर ही धुरा आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे..

  


कोण आहेत नोएल टाटा?


नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पॅरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.


टाटा सन्समध्ये कोणाची किती हिस्सेदारी


टाटा ट्रस्ट - 66 टक्के 
टाटा समूह - 12.8 टक्के 
टाटा कुटुंब - 2.8 टक्के 
शाहपूरजी पालनजी समूह - 18.4 टक्के 
————-


टाटा ट्रस्टमध्ये कोणाचा किती वाटा?


सर दोराबजी टाटा ट्रस्ट - 28 टक्के 
सर रतन टाटा ट्रस्ट - 24 टक्के 
इतर टाटा ट्रस्ट - 14 टक्के


टाटा सन्सचा कारभार एन. चंद्रशेखरन


रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे कोणाकरे सोपवायचा हे ठरवण्यासाठी आज (11 ऑक्टोबर) टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सध्या टाटा सन्सचा कारभार हा एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांच्याकडे आहे. तर टाटा ट्रस्टची तमा ही टाटा कुटुंबियांकडेच असेल.  


हेही वाचा :


Ratan Tata Speech: तुम्हाला संदेश द्यायचाय तो मनातून आलेला असेल, रतन टाटा यांचं 'ते' भाषण ऐकून पंतप्रधान मोदींनी वाजवलेल्या टाळ्या


Ratan Tata Dog : दिलदार टाटांच्या दयाळूपणावर लाडक्या गोवाची निष्ठा अपरंपार, दिवसभर अन्नाला शिवलं नाही, पार्थिवाजवळच बसून राहिला!


रतन टाटांना शेवटचे पाहण्यासाठी धावत आले, पण..., आक्रोश करणाऱ्या जमावाला शांतनू म्हणाला Everything is Over