Bopdev Ghat Incident: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला तब्बल नऊ दिवस उलटूनही आरोपींचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत असूनही आणि त्यांचे स्केच शेअर करून देखील या घटनेतील आरोपींचा कोणताही मागमूस लागत नसल्याचं चित्र आहे. बलात्कार प्रकरणातील पसार झालेल्या तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. मात्र 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जातोय. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आल आहे. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. 


प्रकरणात सराईतांची चौकशी


पोलिसांकडून आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.


बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात नऊ दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 60 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध


या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक : 8691999689 पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.