एक्स्प्लोर

Nehal Modi : पळपुट्या नीरव  मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक, भारतात कधी आणलं जाणार? 17 जुलै रोजी सुनावणी

Nehal Modi Arrested:भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नेहाल मोदी याचा शोध सुरु होता. नीरव मोदीसाठी  काळा पैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात नेहाल मोदीचा हात होता. 

Nehal Modi Arrested वॉशिंग्टन : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती भारत सरकारला दिली आहे. नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला शुक्रवारी (4 जुलै) रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई भारतातील दोन मोठ्या यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून करण्यात आलेल्या एक्स्ट्राडिशन रिक्वेस्टच्या आधारावर करण्यात आली आहे. 

भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा समावेश होतो. त्या घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून नेहाल मोदीचा शोध घेतला जात होता. नेहाल मोदी यानं त्याचा उद्योगपती भाऊ नीरव मोदीसाठी काळापैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं समोर आलं होतं. ईडी आणि सीबीआय चौकशीत हे दिसून आलं की नेहाल मोदीनं काही बेनामी कंपन्यांच्या मार्फत मोठी रक्कम विदेशात पाठवली होती. फसवणूक करुन कमावलेल्या पैशांना ट्रॅक बाहेर ठेवण्यामध्ये नेहाल मोदी सहभागी होता. 

प्रत्यार्पणावर 17 जुलै रोजी सुनावणी 

नेहाल मोदीच्या प्रत्यार्पणावर आता पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. त्या दिवशी अमेरिकेच्या कोर्टात स्टेटस कॉन्फरन्स होणार आहे. नेहाल मोदी जामीन अर्ज देखील देण्याची शक्यता आहे. त्याला अमेरिकेच्या सरकारचे वकील विरोध करतील. भारत सरकारचा प्रयत्न नेहाल मोदीला तातडीनं भारतात आणण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवला जाईल.

अमेरिकेच्या प्रशासनाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार प्रत्यार्पणाची कारवाई दोन आरोपांच्या आधारावर केली जात आहे. पहिला आरोप मनी लाँड्रिंगचा आहे. जो मनी लाँड्रिंग कायदा 2002 च्या कलम 3 नुसार  दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोप हा भारतीय दंड संहितेच्या कलम 120 ब आणि 201 नुसार करण्यात आलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget