NHAI Removed Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर टोल भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फास्टॅग सेवेतून (FASTag)  पेटीएमला वगळण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. पेटीएम बँकेच्या ऐवजी आता त्या ठिकाणी इतर नऊ बँकांसोबत करार करण्यात येणार आहे.  


पेटीएम पेमेंट बँकेला फास्टॅग सेवेतून वगळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 9 बँकांशी हातमिळवणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट्स बँकेला 15 मार्चनंतर ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे एनएचएआयला ही व्यवस्था करावी लागली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक देशभरातील 247 टोल प्लाझाच्या टोल संकलनाचे व्यवस्थापन करते. ती या टोल प्लाझासाठी अॅक्वायर बँक म्हणून काम करते.


पेमेंट बँकेचे देशातील 247 टोल प्लाझावर काम 


NHAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सांगितले की इतर 9 बँका पेटीएम पेमेंट्स बँकेची जागा घेतील. या बँकांद्वारे सर्व 247 टोल प्लाझावर पेमेंट केले जाऊ शकते. RBI च्या निर्णयामुळे One 97 Communications ची उपकंपनी असलेली Payments Bank वगळण्यात आली आहे. पेटीएम पेमेंट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या या 247 टोल प्लाझांचा दैनंदिन टोल संकलनात 190 कोटी रुपयांचा वाटा आहे. एकूण टोलवसुलीच्या हे प्रमाण 14 टक्के आहे.


या बँकांना अधिग्रहण बँका बनवण्यात आल्या


इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेऐवजी NHAI च्या भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीने Axis Bank, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेची निवड केली आहे. हे सर्वजण टोल सेवेचा व्यवसाय सांभाळतील. ते सर्व अॅक्वायर बँक म्हणून काम करतील.


अॅक्वायरर बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी FASTag द्वारे केलेल्या पेमेंटवर प्रक्रिया करते. दैनंदिन संकलनाच्या 0.13 टक्के NHAI एक्वायरर बँकेला कार्यक्रम व्यवस्थापन शुल्क म्हणून दिले जाते. 247 टोल प्लाझांपैकी ज्यावर पेटीएम ही अधिग्रहित बँक आहे, 122 एनएचएआयद्वारे, 56 राज्य संस्थांद्वारे आणि 65 खाजगी कंपन्यांद्वारे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर (बीओटी) तत्त्वावर चालवले जातात. 2023 मध्ये टोल वसुलीचा आकडा 48,028 कोटी रुपये होता. यंदा तो 53 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.


फास्टॅगमध्ये पेटीएमची 30 टक्के भागीदारी 


अधिग्रहण करणारी बँक असण्याव्यतिरिक्त, पेटीएमची फास्टॅगमध्ये 30 टक्के भागीदारी आहे. देशात एकूण 7.98 कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 1.8 कोटी पेटीएमचे आहेत. NHAI ने शुक्रवारी फास्टॅग सेवेतून पेटीएम पेमेंट्स बँकेचे नाव काढून टाकले होते. यादीतील अपडेटनुसार, एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक, कॉसमॉस बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक यांचा देखील यादीत समावेश करण्यात आला आहे.


ही बातमी वाचा: