Noida International Jewar Airport : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या 'नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे' (जेवार विमानतळ) (Noida International Jewar Airport) काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सर्वजण या विमानतळाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्ली-एनसीआर भागातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार यामुळं कमी होणार आहे. या विमानतळामुळं भारत जगाच्या नकाशावर येणार आहे. कारण सिंगापूरप्रमाणेच येथून ट्रान्झिट फ्लाइट्सही जोडली जातील. दरम्यान, या विमानतळावरुन  इंडिगो प्रथम आपली विमानसेवा सुरु करणार आहे.


काम लवकरच पूर्ण होणार


दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या नोएडामध्ये जेवर विमानतळाचे (Jewar Airport) काम वेगाने सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. आता या विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स प्रथम विमानसेवा सुरू करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे.  इंडिगोने नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. या विमानतळावर सेवा सुरू करणारी पहिली विमान कंपनी होण्याचे कंपनीने मान्य केले आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.


उत्तर प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढणार


'नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ' आणि इंडिगो जेवार, नोएडा येथे बांधल्या जाणार्‍या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीने सहमती दर्शवली आहे की ते दोघेही उत्तर प्रदेशमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एकत्र काम करतील. इंडिगोला विमानतळ मार्गांची रचना करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या भागात एकूण तीन व्यावसायिक विमानतळे आहेत. हे विमानतळ दिल्लीपासून 75 किमी अंतरावर आहे.


2024 मध्ये हे विमानतळ कार्यान्वित होणार


इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो ही नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु होणारी पहिली विमानसेवा असणार आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे. येथून त्यांना कंपनीच्या संपूर्ण नेटवर्कवर चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. 2024 मध्ये हे विमानतळ कार्यान्वित होण्याची कंपनी वाट पाहत आहे. कंपनी आपल्या नेटवर्कवरील लोकांना स्वस्त, वेळेवर आणि सहज प्रवासाचा अनुभव देईल. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Shirdi News : 'गावाला लागून शिर्डीचे भव्य विमानतळ, मात्र गावात साधी एसटी येत नाही; शिर्डीजवळील काकडी गावकऱ्यांचा आरोप