NLC India Renewables Ltd IPO: सध्या देशातील अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी या कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. सध्या लग्नाईटपासून ते उर्जा उत्पादन अशा विस्तृत क्षेत्रात काम करणारी एनएलसी इंडिया लिमिटेड (NLCIL) ही कंपनी आगामी वित्त वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाही आपल्या एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेड या उपकंपनीचा आयपीओ घेऊन येणार आहे. आयपीओच्या मदतीने या कंपनीकडे निधीची उभारणी केली जाणार आहे. कंपनीचे अध्यक्ष प्रसन्न कुमार मोटुपल्ली यांनी याबाबत सविस्तर सांगितले आहे. सार्जनिक क्षेत्रातील ही कंपनी 2030 पर्यंत अक्षय्य ऊर्जा क्षमतेला सध्याच्या 1.4 गीगावॅटपासून सहा गीगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 


IPO चा उद्देश काय असेल?  


आयपीओच्या माध्यमातून उभ्या करण्यात आलेल्या निधीचा उपयोग उर्जानिर्मितीच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे. 


आयपीओ नेमका कधी येणार? 


मोटुपल्ली यांनी आयपीओ नेमका कधी येणार याबाबत माहिती दिली आहे. "एनएलसीआयएल कंपनीची संपत्ती या कंपनीची उफकंपनी असलेल्या एनएलसी इंडिया रिन्यूएबल्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरीत करणे अद्याप बाकी आहे. या हस्तांतरणासाठी भारत सरकारची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीची प्रक्रिया चालू आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित आयपीओ येईल, अशी अपेक्षा आहे" असे मोटुपल्ली यांनी सांगितले.


एनएलसी इंडिया कंपनी नेमकं काय करते?


एनएलसी इंडिया या कंपनीची सहा गीगावॅट उर्जानिर्मितीची क्षमता आहे. यामध्ये ही कंपनी 1.4 गीगावॅट अक्षय ऊर्जा तर 4.6 गीगावॅट थर्मल ऊर्जा निर्माण करू शकते. भविष्यात या कंपनीकडून 17 गीगावॅटपर्यंत उर्जानिर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे उर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार? किसान क्रेडिट कार्डविषयीही मोठा निर्णय? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता!


केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते 'ही' मोठी खुशखबर, अर्थसंकल्पात घोषणा होणार का?


अर्थसंकल्पाच्या आधी गुंतवणूक केल्यास 'हे' पाच स्टॉक्स तुम्हाला करणार मालामाल?